Pune News:पुण्यात नशा करण्यासाठी गुंगीच्या औषधांची विक्री, परराज्यात धागेदोरे, मंत्र्यांचा मोठा खुलासा

तरुणाईला या औषधांचा मोठा धोका आहे. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पुणे शहरात विनापरवाना आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक औषधे नशा करण्यासाठी दिली जात आहेत
  • पाच जणांवर गुंगी औषध साठा प्रकरणी आरोप निश्चित असून त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे
  • जप्त औषधे प्रमाणित असून त्या स्थानिक मेडिकल स्टोअरमधून विकत घेतलेली नाहीत, पुरवठा बाहेरच्या राज्यातून झालाय
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. पुणे शहरात विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक औषधे नशा करण्यासाठी दिली जातात. त्याची बेकायदेशीर खरेदी-विक्री ही केली जाते. अशा औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. ते  विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. याबाबत आमदार चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर आमदार अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या पाचही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेली औषधे ही प्रमाणित असूनती कोणत्याही स्थानिक मेडिकल स्टोअरमधून विकत घेतलेली  नाहीत. तपासादरम्यान संबंधित औषधांचा पुरवठा बाहेरच्या राज्यातून झाल्याची माहिती पुढे आली आहे. अशी माहिती ही त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे पुण्यात गुंगीची औषधे दिली जात आहेत ही बाब स्पष्ट झाली आहे.  

नक्की वाचा - 'भारताने माझा विश्वासघात केला' 37 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा देश सोडण्याचा निर्णय, थेट इराणला जाणार

या औषध पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे असही कदम यांनी यावेळी सांगितलं.  दरम्यान, पुणे शहरात बनावट नशेची औषधे तयार करणारी कोणतीही कंपनी आढळून आलेली नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे शहरासह राज्यभरात अशा प्रकारच्या औषध विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित कारवाई केली जात असल्याचे  राज्यमंत्री योगेश कदम  यांनी यावेळी सांगितले. पुण्यात अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्यात आता या गुंगीच्या औषधांची भर पडली आहे. तरुणाईला या औषधांचा मोठा धोका आहे. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

नक्की वाचा - Maya Ivenate: भाजपच्या यादीत सरप्राईज नाव! उमेदवारी मिळालेल्या माया ईवनाते कोण? काय आहे राष्ट्रपतींशी कनेक्शन

पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसात ड्रग्जचा सुळसुळाट असल्याचा आरोप केला जात होता. मद्या सोबत नशेचा दुसरा मार्ग अवलंबला जात आहे असं ही सांगितलं जात होते. पुण्या जवळ साताऱ्यात ही ड्रग्जचे काही अड्डे उद्धवस्त करण्यात आले होते. या सर्व गोष्टी पाहाता विद्येचे माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात नक्की चाललंय तरी काय असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे गँगवॉर, कोयता गँग, महिलांवरचे अत्याचार यासारख्या घटना वारंवार होताना आपण पाहात आहे. त्यात आता या गुंगीच्या औषधांनी डोकंवर काढलं आहे.  

Advertisement