- कात्रज बायपास मार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे
- या मार्गावर कमाल वेगमर्यादा ४० किमी प्रतितास करण्यात आली आहे.
- नवीन वेगमर्यादा आदेश 4 डिसेंबर 2025 पासून लागू होतील.
कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार अपघात होतात. या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक होते. पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीत हे अपघात गेल्या काही दिवसात झाले आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोटार वाहन कायद्याचा वापर करण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी एक निर्णय घेतला आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास करण्यात आली आहे. ही वेग मर्यादा अनिवार्य करण्यात आली आहे. शिवाय त्याबाबतचे आदेश ही जारी करण्यात आले आहे.
मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांनासाठी ही वेग मर्यादा शिथील करण्यात आली आहे. त्यात अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. हे सोडून अन्या वाहनांना 40 किमी प्रतितास वेगानेच या मार्गावर गाडी चालवता येणार आहे. हे आदेश 4 डिसेंबर 2025 पासून लागू राहणार आहेत. या मार्गावर यापूर्वी वेगमर्यादेबाबत दिलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती ही वाहतूक विभाग पुणे यांनी दिली आहे.
वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे स्पीडोमीटर नियमित तपासावेत असं आवाहनही पुणे वाहतूक पोलीसांकडून करण्यात आले आहे. रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन ही वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर CCTV व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाहतूकीचे नियम पाळावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
नवले ब्रिज परिसरात अनेक अपघात झाले आहे. त्यावर त्यात आतापर्यंत मोठी जीवित हानीही झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या रोषालाही पोलीसांना सामोरे जावे लागले आहे. वाहतूक कोंडी आणि त्यात वाहनांचा वेग यामुळे हे अपघात झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळेच आता वाहनांच्या वेगालाच चाप बसवण्याचं काम करण्यात आलं आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.