Pune News: पार्थ पवारांच्या साखरपुड्याचं निमंत्रण कुणा-कुणाला? पाहुण्यांची यादी आली समोर, शरद पवारांना...

त्यानंतर त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा झाली होती. या चर्चांना आता पवार कुटुंबीयांनी पुर्ण विराम देत या दोघांच्या लग्नाची घोषणाच केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तयारी जोरदार सुरू आहे. साखरपुड्याची तारीख आणि जागा ही नक्की झाली आहे. यासाठी ज्या पाहुण्यांना बोलवायचं आहे त्याची यादी ही पवार कुटुंबीयांनी तयार केली आहे. काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा होणार आहे. कायनात दारा यांच्या सोबत पार्थ यांचा साखरपुडा होत आहे. पार्थ यांच्यासोबत अनेक वेळा कायनात यांना पाहीले जात होतं. त्यानंतर त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा झाली होती. या चर्चांना आता पवार कुटुंबीयांनी पुर्ण विराम देत या दोघांच्या लग्नाची घोषणाच केली आहे. 

पार्थ पवार आणि कायनात यांचा साखरपुडा पुण्यात होणार आहे. यासाठी पंचतारांकीत हॉटेल बुक करण्यात आलं आहे. हॉटेल रिट्झमध्ये हा साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. 29 जुलैला हा सारखपुडा होणार आहे. त्याची निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आली आहे. सध्या ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पत्रिका अगदी सुटसुटीत आहे. श्री गणेशाय नम: अशी सुरूवात त्यात करण्यात आली आहे. त्यात पार्थ आणि कायनात यांची नावं ठळकपणे आहे. तर शेवटी पवार आणि दारा कुटुंबीय असं लिहीलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Kaiynaat Dara: पार्थ पवारांची होणारी पत्नी कायनात दारा आहेत तरी कोण? राष्ट्रवादीने जाहीर केली अधिकृत माहिती

या हायप्रोफाईल साखरपुड्यासाठी कुणा- कुणाला निमंत्रित करण्यात आलं आहे याची उत्सुकता होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांना या साखरपुड्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. शिवाय राष्ट्रवादीच्याच काही मोजक्या माजी आमदारांनाही या साखरपुड्याचे निमंत्रण दिलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती या साखरपुड्याला राहाणार आहे. या शिवाय विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना ही निमंत्रण धाडण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

या साखरपुड्यासाठी 200 ते 250 पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. शरद पवारांसह पवार कुटुंबातील प्रत्येक सदस्य या साखर पुड्याला उपस्थित असतील. तर कायनात यांच्या कुटुंबातील काही मोजके सदस्य या साखरपुड्यासाठी पुण्यात येणार आहे. साखरपुड्यानंतर काही दिवसात विवाह सोहळा ही पार पडेल असं सांगितलं जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबात हा साखरपुडा सोहळा होत आहे. या आधी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांचे लग्न नुकतेच पार पडले होते.