Pune News : मध्यरात्री अचानक जागी झाली मुलगी अन् समोर सर दिसले; पुण्यात 14 वर्षांच्या मुलीबाबत संतापजनक प्रकार

Pune News :  पुण्याच्या आंबेगाव पठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरिफ सय्यद नावाच्या क्लास चालकाला ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News : नराधम शिक्षकाने ओळखीचा गैरफायदा घेतला.
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News :  पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचाराची धक्कादायक घटना ताजी आहे. त्यातच आता कात्रज भागात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लास चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. पवित्र अशा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही खळबळजनक घटना पुण्याच्या आंबेगाव पठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरिफ सय्यद नावाच्या क्लास चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बालकांचे संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही 14 वर्षांची मुलगी नियमितपणे कात्रज येथील आरिफ सय्यद या शिक्षकाकडे शिकवणीसाठी जात होती. पीडित मुलगी लहानपणापासूनच त्याच्याकडे शिकत असल्याने त्यांची कौटुंबिक ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत नराधम शिक्षकाने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. 

Advertisement

मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन क्लासच्या वेळी माऊस किंवा की-बोर्ड वापरताना तो मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. मात्र, ओळखीचे सर असल्याने ते चुकून होत असावे, असे समजून मुलीने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले.

( नक्की वाचा : Nashik News:"त्यांनी आमचा 20 किमी पाठलाग केला अन्...", नाशिकच्या पीडित महिलेनं सांगितला भयंकर अनुभव, VIDEO )

सरांच्या घरी मुक्कामी असताना धक्कादायक प्रकार

अंदाजे 3 ते 4 आठवड्यांपूर्वी पीडित मुलगी सरांच्या घरी ऑनलाईन मदरसा क्लास घेण्यासाठी गेली होती. रात्री 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास क्लास संपल्यानंतर खूप रात्र झाली आहे, तू इथेच झोप, उद्या सकाळी घरी सोडतो, असे शिक्षकाने मुलीला सांगितले. नराधम शिक्षकाची मुलगी देखील घरी हजर असल्याने आणि तिथे इतर विद्यार्थीही नेहमी राहत असल्याने मुलगी आणि तिच्या वडिलांना यात काही गैर वाटले नाही. 

सरांचे घर 1 बीएचके असून बेडरूममध्ये सामान असल्याने रात्रीच्या वेळी हॉलमध्ये सर्वजण झोपले होते. भिंतीला लागून मुलगी झोपली होती आणि तिच्या बाजूला सरांची मुलगी, तिची मैत्रीण, सरांचा मुलगा आणि स्वतः सर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मुलीला कोणीतरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे जाणवले. दचकून जागी झाली असता तिला शेजारी स्वतः सर बसलेले दिसले. या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेली मुलगी रात्रभर रडत एका जागी बसून राहिली.

या घडलेल्या गंभीर प्रकारानंतर मुलगी प्रचंड मानसिक धक्क्याखाली होती. ती घरात कोणाशीही बोलत नव्हती आणि शांत शांत राहत होती. मुलीच्या वागण्यात झालेला हा बदल पाहून तिच्या मोठ्या बहिणीला संशय आला. बहिणीने विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, पीडित मुलीने शिक्षकाने रात्रीच्या वेळी केलेला हा घृणास्पद प्रकार रडत रडत सांगितला. त्यानंतर बहिणीने तातडीने वडिलांना याची कल्पना दिली आणि घटनेचे गांभीर्य समोर आले.

Advertisement

नागरिकांनी दिला चांगलाच चोप

मुलीसोबत घडलेल्या या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी संतप्त झालेल्या पालकांनी थेट क्लास चालकाचे घर गाठले. सुरुवातीला आरिफ सय्यद याने आपल्याकडून मोठी चूक झाल्याची कबुली दिली. मात्र, एका शिक्षकानेच अल्पवयीन मुलीसोबत असे कृत्य केल्याचे समजताच तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांचा संयम सुटला. 

नागरिकांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला. यानंतर तातडीने आंबेगाव पठार पोलिसांना पाचारण करून या आरोपी क्लास चालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
 

Advertisement

Topics mentioned in this article