Pune News: भावाच्या अंत्यसंस्काराला जेलमधून कुख्यात गुंड समीर काळे पोहचला, स्मशानभूमीत ढसाढसा रडला

जेलमधून समीर काळे याला अंत्यविधीसाठी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे पोलीसांच्या बंदोबस्तात समीर काळे स्मशानभूमीत पोहोचला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे

पुण्यात गँगवॉर काही थांबण्याचे नाव घेत नाही. या गँगचे म्होरके जरी जेलमध्ये असले तरी त्यांचे हँडलर्स मात्र सक्रीय असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा बदला म्हणून गणेश काळे याचा खून करण्यात आला. गणेश काळे हा कुख्यात गुंड आणि वनराज हत्या प्रकरणातला आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ होता. त्याच्या मृत्यूनंतर त्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी जेलमधून समीर काळे याला अंत्यविधीसाठी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे पोलीसांच्या बंदोबस्तात समीर काळे स्मशानभूमीत पोहोचला होता. त्यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समीर याच्या हालचालींवर सर्वांचेच बारीक लक्ष होते. 

भाऊ गणेश काळे याच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळे याने हजेरी लावली. त्यासाठी त्याला जेलमधून बाहेर येण्यास परवानगी देण्यात आली. समीर काळे यानेच आपल्या भावावर अंत्यसंस्कार केले. सोमवारी संध्याकाळी गणेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समीर काळे याच्या आश्रूंचा बांध फुटला. तो धायमोकळून रडू लागला. त्याचे रडणे थांबत नव्हते. आपल्या भावाची हत्या झाल्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो जोरजोरात रडत होता. 

नक्की वाचा - Pune News: आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून पुण्यात तिसरी हत्या, पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर?

1 नोव्हेंबर रोजी दुपारी गणेश काळेची हत्या करण्यात आली होती. गणेश काळे याची हत्या टोळीयुद्धानातून झाली. समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत आहे. त्यानेच  वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशहून 10 गन पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  प्राथमिक अंदाजानुसार, वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या करण्यात आली आहे.  

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

गणेश काळे हा समीर काळेचा सख्खा भाऊ आहे. गणेश काळेची निर्घून हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले होते. मात्र त्यांना थोड्याच वेळात अटक करण्यात आली होती.  हत्या करताना वापरलेल्या दोन पैकी एक गाडी जप्त करण्यात आली आहे. अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल, मयूर वाघमारे आणि दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण पाच आरोपी अटकेत आहेत. या हत्येला आंदेकर टोळी विरुद्ध कोमकर टोळी अशी किनार आहे. भावाच्या मृत्यूनंतर समीर काळे हा स्मशानभूमीत ढसाढसा रडताना दिसला.  
 

Advertisement

Topics mentioned in this article