Pune News: पुण्यात 'या' हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकांची मोठी भरती, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची ही भरती काढली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को), पुणे यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय चालवलं जातं. या रुग्णालयात बारामती येथे कंत्राटी पध्दतीने बिनहत्यारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे सुरक्षा रक्षकांची कंत्राटी भरती आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. 

यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य, पत्नी तसेच निम-लष्करी सेना (BSF, Assam Rifles, ITBF, TA, GREF, CISF, CRPF, SRPF) मधील निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नी पात्र राहतील असं सांगण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी  यशवंत बांदल, पर्यवेक्षक (मो.क्र.9422830475) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ले.क.हंगे स.दै.(नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

नक्की वाचा - Pune Mhada: पुण्यात म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी स्वस्तात मस्त घरं, अर्ज करताना किती पैसे भरावे लागणार?

दरम्यान काही दिवसांपूर्वी  पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची ही भरती काढली आहे. विविध पदांसाठी ही भरती असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. हे उमेदवार 5 वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले जातील. ही भरती प्रक्रिया नागपूर मेट्रो रेल प्रकल्प, पुणे मेट्रो रेल प्रकल्प, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्प आणि नवी मुंबई मेट्रो लाईन-1 च्या कामासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.  सविस्तर माहितीसाठी महामेट्रो नोकरी या लिंकवर क्लिक करा.