Pune News: पुण्यात भुंग्याची नवी प्रजाती सापडली, नाव ही ठरलं, वाचा सविस्तर

या भुंग्यांच्या अळ्या (white grubs) पिकांच्या मुळांना खाऊन उत्पादनात घट आणतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे 

भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिम प्रादेशिक केंद्र, पुणे येथील शास्त्रज्ञांनी सेरिसिन चाफर बीटल या भुंग्याच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीला 'नियोसेरिका आकुर्डी कलावटे, 2025' असे नाव देण्यात आले आहे. ही नवीन प्रजाती पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षण (Zoological Survey of India) च्या परिसरात आढळून आली आहे.

काय संशोधन आणि कोण संशोधक ?
या महत्त्वपूर्ण शोधासाठी डॉ. अपर्णा कलावटे, पूजा कुमार मिसाल आणि नॅन्सी सुप्रिया यांनी संशोधन केले आहे. हे संशोधन 'रेकॉर्ड्स ऑफ द झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया' या प्रतिष्ठित वैज्ञानिक मासिकात प्रकाशित झाले आहे. या भुंग्यांचे बाह्य स्वरूप सारखे असल्यामुळे, प्रजाती ओळखण्यासाठी नर जननेंद्रियांचा (male genitalia) सखोल अभ्यास करणे आवश्यक असते. हा अभ्यास पुण्यातील संग्रहालयात उपलब्ध असलेल्या नमुन्यांवरून करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Pune News: हडपसरवासीयांची कोणतीही समस्या Whatsapp वर नोंदवता येणार, अजित पवार ऑन द स्पॉट सोडवणार

प्रजातीची माहिती आणि महत्त्व
हा भुंगा स्काराबेइडे (Scarabaeidae) कुळातील मेलोलोन्थिनी (Melolonthinae) उपकुलाशी संबंधित आहे. या उपकुलातील बहुतांश भुंगे वनस्पतींवर उपजीविका करतात. त्यामुळे शेती आणि बागायती पिकांसाठी ते हानिकारक ठरू शकतात. ही नवीन प्रजाती देखील संभाव्यत: पिकांवर परिणाम करू शकते. सेरिसिन चाफर भुंग्यांच्या जगभरात 4,600 हून अधिक प्रजाती ज्ञात आहेत. त्यापैकी सुमारे 700 भारतात आढळतात.

या भुंग्यांच्या अळ्या (white grubs) पिकांच्या मुळांना खाऊन उत्पादनात घट आणतात. तर प्रौढ भुंगे पाने आणि फुले खातात. त्यामुळे या प्रजातींचे योग्य वर्गीकरण आणि दस्तावेजीकरण करणे पीक संरक्षण, कीड व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Advertisement