Pune News: एक चुक नडली अन् 7 जण लिफ्टमध्ये अडकले, 3 तास बचावासाठी धडपड, अखेर...

लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना ऑक्सिजनची कमतरता भासू नये आणि त्यांनी घाबरू नये, यासाठी जवानांनी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सांगवी परिसरातील शंकर प्लाझा इमारतीतील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाडामुळे सात जण अडकले होते
  • लिफ्टमध्ये अधिक वजनामुळे अचानक बंद पडल्याने आत अडकलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
  • इमारतीतील लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती देऊन बचावकार्य सुरू केले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात एका इमारतीमध्ये धक्कादायक घटना घडली. इमारतीत असलेल्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याच वेळी लिफ्टमध्ये सात जण होते. अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे या सात जणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नक्की काय झाले आहे हे समजण्याचा मार्ग नव्हता. इमारतीमधील इतर लोकांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर दोन ते तीन तास बचावकार्य सुरू होतं. तो पर्यंत ते सात जण लिफ्टमध्येच होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन या सातही जणांची सुखरूप सुटका केली. वेळेत मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. सुटका झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

नेमकी घटना काय?
सांगवी येथील गजबजलेल्या कृष्णा चौकाजवळ शंकर प्लाझा ही इमारत आहे. या इमारतीमधील लिफ्टमध्ये सात व्यक्तींनी एकाच वेळी प्रवेश केला होता. मात्र, लिफ्टच्या विहित क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लिफ्ट दोन मजल्यांच्या दरम्यान अचानक अडकून पडली. आत असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न  केला. पण दोन मजल्यांच्या मध्ये लिफ्ट अडकली असल्याने ते ही फार काही करू शकले नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Tamil Nadu News: विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा! 'या' पक्षांनी दिला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार

अग्निशमन दलाची तत्परता
इमारतीमधील लोकांनी त्यानंतर या बाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लिफ्ट पूर्णपणे लॉक झाल्यामुळे ती उघडणे मोठे आव्हान होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध अत्याधुनिक अवजारांचा आणि साहित्याचा वापर करून लिफ्टचे दरवाजे उघडण्याचे प्रयत्न सुरू केले. लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना ऑक्सिजनची कमतरता भासू नये आणि त्यांनी घाबरू नये, यासाठी जवानांनी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला. त्यांना धीर दिला. 

नक्की वाचा - Raigad 10th Result: मुली नाही तर मुलांची बाजी! पोलादपूर तालुका जिल्ह्यात अव्वल, निकालाची सगळीकडे चर्चा

दोन तास बचाव कार्य
अग्निशमन दलाचे जवान जवळपास  2 ते 3 तास लिफ्टचा दरवाजा उघडत होते. शेवटी अथक परिश्रमानंतर लिफ्टचा दरवाजा यशस्वीपणे उघडण्यात आला.आत अडकलेल्या सर्व सातही जणांना सुखरूप बाहेर काढले. बाहेर आल्यानंतर या सर्वांचा जीव भांड्यात पडला. लिफ्ट वापरताना तिच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवेश करणे धोक्याचे ठरू शकते. तांत्रिक मर्यादांचे पालन केल्यास असे अपघात टाळता येतात, असे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केले. वेळेवर मदतीला धावून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.