- तामिळनाडूतील विजय यांच्या टीव्हीके पक्षाला डाव्या पक्षांनी आणि व्हीसीकेने पाठिंबा दिला आहे
- विजय आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा दावा करणार असून सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे
- टीव्हीके आणि काँग्रेसचे ११३ आमदार असून त्यात डाव्या पक्षांचे चार आणि व्हीसीकेचे दोन आमदार पाठिंबा आहे
तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूच्या राजकारणाने शुक्रवारी एक ऐतिहासिक वळण घेतले आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाला डाव्या पक्षांसह (CPI, CPI-M) आणि विदुथलाई चिरुथाईगल कात्ची (VCK) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून, ते आज सायंकाळी 4:30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे.
बहुमताचे गणित सुटले
निवडणूक निकालानंतर बहुमतासाठी लागणारा आकडा गाठताना ओढाताण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या प्रमुख पक्षांनी जनमताचा आदर करत विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. टीव्हीकेचे नेते कामराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असून मित्रपक्षांच्या साथीने एक स्थिर सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन होईल. टीव्हीके आणि काँग्रेसचे मिळून 113 आमदार होते. त्यात आता डाव्या पक्षाचे 4 आणि व्हीसीके पक्षाचे 2 आमदारांनी पाठिंबा देवू केला आहे. त्यामुले हा आकडा आता 119 झाला आहे. जो की बहुमता पेक्षा एकने जास्त आहे.
नक्की वाचा - Vijay TVK: विजयला मिळणार का सत्तेची चावी? तामिळनाडूच्या राजकारणात 5 मोठे पेच
राजकीय वर्तुळात खळबळ
डाव्या पक्षांनी पाठिंब्याचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नईतील टीव्हीके पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष सुरू केला आहे. द्रविड राजकारणाच्या बालेकिल्ल्यात एका नव्या चेहऱ्याचा उदय झाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. आज 4.30 वाजता होणाऱ्या राज्यपाल भेटीनंतर तामिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाबाबत अधिक स्पष्टता येईल. या भेटीत विजय बहुमताचा आकडा आपल्याकडे असल्याचं राज्यपालांना सांगतील.तसे पत्र ते राज्यपालांना देतली. त्यानंतर राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवतील.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या 'थलापती' विजय यांच्या नावाची त्सुनामी पाहायला मिळत आहे. विजय आता तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या पक्षांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विजय मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होताच चेन्नईत टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला. "लोकांनी दिलेला कौल डाव्या पक्षांनी मान्य केला असून विजय यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे," असे टीव्हीके नेते कामराज यांनी उत्साहात सांगितले.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: TVK leader Kamaraj says, "At present, TVK is going to gain the full majority. Vijay is going to meet the Governor at 4.30 pm to stake claim to form Govt. We are very happy to see that CPI, CPI(M) and VCK have accepted the people's mandate to form the… https://t.co/vgANAXXYN8 pic.twitter.com/ElLjUeozGC
— ANI (@ANI) May 8, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world