Pune News: दवाखान्यात चालत आले अन् क्षणात हृदयविकाराचा झटका! काळजाचा ठोका चुकवणारी घटना CCTV मध्ये कैद

त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना ही काय झाले आहे हे क्षणात समजले नाही. सर्वांचीच एक धावाधाव झाली. कुटुंबीयांनी आरडाओरडा केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार 

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अशी आहे की ती पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं घडली आहे. येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. ही सर्व प्रसंग तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे लाईव्ह हार्ट अटॅकचे उदाहरण म्हणावे लागेल. 

ही घटना पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा या गावात घडली आहे. गावातील एक 60 वर्षीय व्यक्तीला त्रास होत होता. म्हणून त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. हा रूग्ण दवाखान्यात स्वत: च्या पायावर चालत आला होता. चालत चालत हे रूग्णालयात पोहोचले ही होते. पण ज्या वेळी ते रुग्णालयाच्या दारातून आत येत होते, त्याच वेळी ते धाडकन जमिनीवर कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना ही काय झाले आहे हे क्षणात समजले नाही. सर्वांचीच एक धावाधाव झाली. कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. 

Advertisement

नक्की वाचा - Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आता सेलिब्रेटींकडे मोर्चा! 'ते' बडे कलाकार रडारवर, थेट इशारा देत मोठे संकेत

डॉक्टर ही तिथे तातडीने धावत आले. रुग्ण दारातच कोसळला होता. त्या रुग्णावर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तपासणीसाठी स्वतःच्या पायाने रुग्णालयात आलेले 60 वर्षीय रुग्ण काही क्षणांतच दारात कोसळले. अचानक आलेला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर डॉक्टरांनी केलेली जीव वाचवण्यासाठीची धडपड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे रुग्णाचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू झाले. त्यांचे प्राण वाचले. 

नक्की वाचा - Nashik News: पाण्याचा वेढा, घरा-घरात पाणी, 400 कुटुंबांचे स्थलांतर, बत्तीही गुल! 'या' गावाची भयावह स्थिती

या घटनेने आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार किती महत्त्वाचे असतात हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ खरोखर काळजाचा ठोका चुकवणाराच आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्षणात कुणालाच काही समजले नाही. मात्र डॉक्टरांनी आणि त्यांच्या स्टाफने दाखवलेली तत्परता सर्वांच्याच कौतूकाचा विषय ठरली आहे. त्यामुळेच या रुग्णाचे जिव वाचू शकले आहेत.