जाहिरात

Pune News: 'फ्लाइंग जिप्सी' कॅफेतील ग्लास फोडले, निलंबन ओढवून घेतले, पुढच्या 10 दिवसात असे काही घडले की...

आपल्याला न्याय मिळाला अशी भावना या निमित्ताने कदम यांनी व्यक्त केली आहे.

Pune News: 'फ्लाइंग जिप्सी' कॅफेतील ग्लास फोडले, निलंबन ओढवून घेतले, पुढच्या 10 दिवसात असे काही घडले की...
  • डेक्कन पोलीस हद्दीत फ्लाइंग जिप्सी कॅफेवर नियमभंगाच्या अनेक तक्रारी आधीपासून नोंदल्या गेल्या होत्या
  • कॅफे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने उपनिरीक्षक संदीप कदम यांनी ७ जूनला थेट कारवाई केली होती
  • कदम यांनी कारवाई करताना कॅफेमधील ग्लास तोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
पुणे:

डेक्कन पोलीसांच्या हद्दीत फ्लाइंग जिप्सी हा कॅफे आहे. या कॅफेवर नियमाचे उल्लंघन करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. असं असताना ही हा कॅफे रात्री उशिरा पर्यंत सुरू असतो. या पार्श्वभूमीवर 7 जूनला ही हा कॅफे जवळपास रात्री पावणे दोन वाजेपर्यंत सुरू होता. त्यावर उपनिरिक्षक संदीप कदम यांनी सिंघम स्टाईल कारवाई केली. त्यावेळी त्यांनी कॅफेतील ग्लासची तोडफोड केली. त्याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. पुढे याच व्हिडीओ मुळे 29 जूनला कदम यांचे निलंबन करण्यात आले होते. पण या कारवाईला दहा दिवस होत नाहीत तोच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहेत. त्याची चर्चा आता पुण्यात चांगलीच रंगली आहे. 

डेक्कनमधील बेशिस्त कॅफे म्हणून 'फ्लाइंग जिप्सी' या कॅफेवर आरोप केला जातो. या कॅफे बाबत अनेक तक्रारी ही झाल्या आहोत. रात्री एक वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्यास बंदी नाही. मात्र त्यानंतर ते बंद करावी लागतात. असं असताना ही कॅफे रात्री उशारी पर्यंत सुरू ठेवला जात होता. या पार्श्वभूमीवर डेक्कन पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक संदीप कदम यांनी थेट कारवाई केली. ते या कॅफेमध्ये गेले. तिथे कॅफे सुरू होता. त्यांनी तो बंद करण्यास सांगितला. तिथे असलेल्या लोकांना बाहेर जाण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी काऊंटरवर असलेले ग्लास आपल्या हातातल्या काठीने फोडले. त्याचा व्हिडीओ काढण्यात आला. तोच  पुढे पुण्यात व्हायरल ही झाला. तो चुकीच्या पद्धतीने पुणे पोलीस आयुक्तांना दाखवला ही गेला. त्यानंतर कदम यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला गेला. 

नक्की वाचा - Trending News: ही डॉक्टर तर वाघीण निघाली! थेट पिंजऱ्यात घुसून नरभक्षी वाघीणीला केलं जेरबंद, पिंजऱ्यातला थरार

29 जूनला हे निवंबन केले गेले. मात्र कदम यांच्यावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं गेलं. ही बातमी माध्यमांमध्ये ही मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे सत्य काय हे पोलीस प्रशासनाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नक्की काय झालं हे पोलिसांनी तपासले. शिवाय कॅफेबाबत तक्रारी काय होत्या त्या ही समोर आल्या. सत्यता पडताळल्यानंतर कदम यांचे निलंबन 8 जुलैल माघारी घेण्यात आले. अवघ्या दहा दिवसात त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंत ते आपल्या कामावर रूजू ही झाले आहेत. आपल्याला न्याय मिळाला अशी भावना या निमित्ताने कदम यांनी व्यक्त केली आहे.   

नक्की वाचा - Pune News: कुणाचा पती, कुणाचा भाऊ, तर कुणाचे वडील! 48 तासानंतर ही ते ढिगाऱ्याखालीच, कुटुंबीयांचा टाहो

निलंबन मागे घेतल्यानंतर उपनिरिक्षक संदीप कदम हे तातडीने कामावर रुजू झाले आहे. कदम हे माऊलींच्या पुणे प्रस्थानाच्या दिवशीच हजर झाले आहेत. त्यांना माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. कदम यांचे निलंबन रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे स्वागत करण्यात आले आहे. काहींनी तर निलंबन झाले ही एक चुकीची कारवाई होती असं ही म्हटलं आहे.  काहींनी तर  फ्लाइंग जिप्सी कॅफे विरोधात आता तरी कडक कारवाई झाली पाहीजे अशी मागणी केली आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com