जाहिरात

Pune News: पुणेकरांची चंगळ! खिसा गरम होणार अन् टॅक्सही वाचणार; 1 एप्रिलपासून 'या' नियमामुळे पगार वाढणार

Pune News: पुण्यात राहून नोकरी करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Pune News: पुणेकरांची चंगळ! खिसा गरम होणार अन् टॅक्सही वाचणार; 1 एप्रिलपासून 'या' नियमामुळे पगार वाढणार
Pune News: पुणेकरांना नव्या नियमाचा मोठा फायदा होणार आहे.
पुणे:


Pune News: पुण्यात राहून नोकरी करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.  1 एप्रिलपासून प्राप्तिकराच्या (Income Tax) नियमात एक असा बदल होत आहे, ज्यामुळे पुणेकरांच्या हातात येणारा पगार (Take Home Pay) वाढणार आहे. आतापर्यंत मुंबई-दिल्लीसारख्या शहरांना मिळणारा विशेष टॅक्स फायदा आता पुण्यालाही मिळणार असून, यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या आयटी प्रोफेशनल्स आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठी बचत होणार आहे.

काय आहे हा नवा नियम आणि पुण्याचा फायदा काय?

इन्कम टॅक्सच्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हाऊस रेंट अलाउन्स (HRA) वर टॅक्स सवलत मिळते. आतापर्यंत फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार शहरांनाच मेट्रो शहरे मानून त्यांच्या मूलभूत पगाराच्या (Basic Salary) 50 टक्के रकमेपर्यंत एचआरए सवलत दिली जात होती. 

पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांत घरांची भाडी प्रचंड वाढली असली, तरी तिथे ही मर्यादा केवळ 40 टक्के होती. मात्र, 1 एप्रिलपासून पुणे देखील या विशेष श्रेणीत समाविष्ट होत असून, आता पुणेकरांनाही 50 टक्के मर्यादेपर्यंत टॅक्समध्ये सवलत मिळणार आहे.

( नक्की वाचा : Job Exit Rules: नोकरी सोडताय? मग ही बातमी वाचाच! 1 एप्रिलपासून बदललेत नियम, तुमचा होणार मोठा फायदा! )

पगार कसा वाढणार आणि कोणाला मिळणार फायदा?

या नियमामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा एचआरए त्यांच्या बेसिक सॅलरीच्या 50 टक्के किंवा त्या आसपास आहे, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, याआधी पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीला ज्या मर्यादेमुळे जास्त टॅक्स भरावा लागायचा, ती मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. 

कर तज्ज्ञांच्या मते, यामुळे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांच्या टॅक्समध्ये वार्षिक 60,000 रुपये ते 1.2 लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळू शकते. सहाजिकच टॅक्स कमी कापला गेल्यामुळे दरमहा हातात येणारा पगार वाढलेला असेल.

( नक्की वाचा : Pune News: चाकणचा ट्रॅफिक जॅम विसरा! 7827 कोटींच्या 'या' मेगा प्रोजेक्टमुळे पुणे-नाशिक प्रवास होणार सुसाट )
 

फक्त 'या' लोकांसाठीच आहे ही संधी

हा फायदा घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ही सवलत केवळ जुन्या कर प्रणालीचा (Old Tax Regime) पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. जे कर्मचारी नवीन कर प्रणालीत (New Tax Regime) आहेत, त्यांना एचआरए सवलतीचा फायदा मिळत नाही. 

त्यामुळे तुमचे घराचे भाडे जास्त असेल आणि तुम्ही जुन्या कर प्रणालीत असाल, तरच हा वाढीव पगार तुमच्या खात्यात जमा होईल. कमी उत्पन्न असलेल्या किंवा कमी भाडे भरणाऱ्या लोकांसाठी मात्र नवीन कर प्रणालीच फायदेशीर ठरू शकते.

कागदपत्रांची पूर्तता आणि कडक नियम

पगार वाढणार असला तरी प्राप्तिकर विभागाने नियमावली कडक केली आहे. जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा पालकांना भाडे देत असाल, तर त्याचे योग्य पुरावे आणि कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे. घरमालकाचा पॅन कार्ड नंबर देणे आणि भाड्याची पावती सादर करणे आता अनिवार्य असेल. 

त्यामुळे पुणेकरांनी या सवलतीचा फायदा घेताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. 1 एप्रिलपासून हा बदल लागू होत असल्याने, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कंपनीच्या ह्युमन रिसोर्स (HR) विभागाशी संपर्क साधून आपली कर गणना तपासून घ्यावी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com