Pune News: पुरंदर येथे हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार, काट्यांच्या ढिगार्‍यात मारल्या जातात उड्या

हजारो भाविकांनी हा काटेबारसचा थरार अनुभवला आहे. तीनशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही परंपरा चालत आल्याचं बोलल जातय.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे

पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळूंचे गावात आज काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रे निमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला.हजारो भाविकांनी हा काटेबारसीचा थरार अनुभवला आहे. लोकांच्या अंगावर काटे आणणारी ही कटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या काट्यांच्या ढिगाऱ्यात लोक स्वतःच्या मर्जीनुसार उड्या घेतात. त्यांना कोणी जबरदस्ती करीत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा नसून तो एक प्रकारचा साहसी खेळ असल्याचे येथील लोक  सांगतात. 

या काटेबारसीच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते, शंभू महादेवाची म्हणजेच ज्योतिर्लिंगाची बहीण आसावरी ही रुसून गेली होती. तिला आणायला गेलेल्या ज्योतिर्लिंग यांनी पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढीगाऱ्यात लोळण घेतलं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते. पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळूंचे गावात, काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रे निमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला. हजारो भाविकांनी हा काटेबारसचा थरार अनुभवला आहे. तीनशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही परंपरा चालत आल्याचं बोलल जातय.

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

"हर बोले हर हर महादेव" चा गजर आणि देव भेटीचे ओढीने बाभळीच्या  काट्यांच्या ढिगार्‍यात उद्या घेणारे भक्तगण,अगदी पाण्यात सूर मारावा असा काट्यांचा ढिगार्‍यात सूर मारून मुक्तपणे लोळण घेतात. हा आरक्षण पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात हजारो भक्तांनी अनुभवला आहे. पुरंदर तालुक्यात असलेल्या गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रे  निमित्त आज अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्यांच्या ढगांमध्ये उडी घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला. गुळूंचे येथे तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्षापासून  ही परंपरा जपली जाते.

नक्की वाचा - Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल

भगवान शंकर म्हणजेच ज्योतिर्लिंग आणि देवाची बहीण यांच्यात वाद झाला, बहीण रुसून गेली, देव तिला आणायला गेले.पण बहीण यायला तयार नव्हती.आपल्या पश्चाताप व्यक्त करण्यासाठी ज्योतिर्लिंग देवाने काट्यांच्या ढीगामध्ये  स्वतःला उघड्या अंगाने झोपून दिले. देवाची ही अवस्था पाहून, बहिणीला त्याची दया आली आणि बहीण भावा बरोबर घरी आली आणि  तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशी आख्यायिका  सांगितले जाते. तीनशे वर्ष पेक्षा जास्त दिवसा पासून ही परंपरा या ठिकाणी सुरू असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जातं.या ढिगत उड्या मारल्याने अंगात फारसे काटे टोचत नाहीत किंवा जर टोचलेच तरी त्यापासून मोठी जखम कधीही झाली नाही असे  काट्यांमध्ये उघड्या घेणारे भक्तगण सांगतात.

Topics mentioned in this article