जाहिरात

Pune News: 3 मित्र, 20 देश, 75 दिवस अन् 16 हजार किमीचा प्रवास, पुणे ते लंडन बाय रोड! एक गोष्ट थक्क करणारी

जागतिक नकाशावर भारतीय संस्कृतीचे दूत म्हणून वावरण्याचा या मित्रांचा संकल्प त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवतो.

Pune News: 3 मित्र, 20 देश, 75 दिवस अन् 16 हजार किमीचा प्रवास, पुणे ते लंडन बाय रोड! एक गोष्ट थक्क करणारी
AI Image
  • पुण्यातील तीन मित्रांनी वयाच्या सत्तरी ओलांडल्या तरी पुणे ते लंडन रस्ते मार्गे प्रवास करण्याचा निर्णय घेतला
  • हा प्रवास ७५ दिवसांत २० देशांतून १६ हजार किलोमीटर अंतर पार करून पूर्ण केला जाणार आहे
  • प्रवासात तिबेटमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प, गोबी वाळवंट आणि युरोपमधील अनेक जागतिक स्थळांना भेट दिली जाणार आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

वयाचा केवळ आकडा असून इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही साध्य करता येते. हे पुण्याच्या तीन मित्रांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही मित्र पन्नाशी ओलांडले आहेत. त्यातील श्रीनिवास राठी हे तर 71 वर्षांचे आहेत. संदीप पत्की हे 55 तर राजीव शाह हे 60 वर्षांचे आहेत. या तिघांनी पुणे ते लंडन अशा साहसी प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही म्हणाल सहासी का? तर हे कोणत्याही विमानाने किंवा बोटीने लंडनला जाणार नाहीत. तर ते रस्ते मार्गे लंडन गाठणार आहेत. त्यांच्या या प्रवाशाची शुक्रवारी सुरुवात झाली. 10 एप्रिल ते 20 जून या 75 दिवसांच्या कालावधीत हे मित्र 20 देशांतून तब्बल 16 हजार किलोमीटरचा प्रवास जमिनीमार्गे पूर्ण करणार आहेत. त्यानंतर ते लंडनला पोहोचतील. त्यांच्या या मोहिमेचं कौतूक होत आहे. 

पुण्यातील मित्रमंडळ चौकातून सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा यांच्या उपस्थितीत या तिघांना निरोप देण्यात आला. या साहसी मोहिमेत सहभागी झालेले राजीव शहा हे वास्तुविशारद आहेत. तर  श्रीनिवास राठी आणि संदीप पत्की हे व्यावसायिक आहेत. "देशो-देशातील प्रेम आणि बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी आपण भारताचे दूत म्हणून काम करावे," अशा शुभेच्छा युवराज शहा यांनी यावेळी दिल्या. पुणेकरांनी ही या तिघांना या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या या धाडसाचे कौतूक ही होताना दिसत आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: ड्रग्ज पार्टीचा 'मास्टरमाइंड' गजाआड! त्या आधी हायव्होल्टेज ड्रामा, पुढे तासभर जे घडले ते...

'अॅडव्हेंचर्स ओव्हरलँड' या कंपनीमार्फत "रोड टू लंडन" ही मोहीम राबवली जात आहे. हा प्रवास भारत, नेपाळ, चीन, मध्य आशिया, रशिया आणि युरोपमार्गे ब्रिटनमध्ये पोहोचेल. 75 दिवसांच्या या सफरीत हे मित्र तिबेटमधील 17,000 फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प, ल्हासाचा पोटाला पॅलेस, गोबी वाळवंट आणि जर्मनीच्या हायस्पीड 'ऑटोबान' रस्त्यांचा अनुभव घेणार आहेत. या ठिकाणांना ते भेटी ही देतील. भारत, नेपाळ, चीन, मध्य आशिया, रशिया आणि युरोपमधून हा प्रवास होणार आहे. किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानमधील ऐतिहासिक सिल्क रूटचा ही त्यांना आनंद घेता येणार आहे. जर्मनीच्या वेगवान ऑटोबानचा अनुभव ते या प्रवासात घेतील. तर बुडापेस्टमधील डॅन्यूब नदीवरील क्रूझ, ब्लू मॉस्क, चार्ल्स ब्रिज, अटोमियम यांसारख्या जागतिक स्थळांना भेटी या प्रवासात आहेत. 

नक्की वाचा - 5 kg LPG Cylinder: 5 किलो LPG गॅस सिलेंडरची किंमत किती? अचानक मागणी वाढली, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, विविध देशांच्या सीमेवर येणारी अनिश्चितता आणि हवामानातील बदल हे मोठे आव्हान असल्याचे या तिघांनी सांगितले. मात्र, या प्रवासात मिळणारा संस्कृतीचा अनुभव आयुष्य समृद्ध करणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही साहसाची ओढ कायम राखत पुण्यातील तिघा मित्रांनी पुणे ते लंडन या रस्ते प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवरील कायदेशीर तांत्रिक बाबी आणि भौगोलिक विषमता अशा आव्हानांनी भरलेला हा प्रवास 'अॅडव्हेंचर्स ओव्हरलँड'च्या माध्यमातून साकार होत आहे. केवळ फिरणे हा उद्देश न ठेवता, जागतिक नकाशावर भारतीय संस्कृतीचे दूत म्हणून वावरण्याचा या मित्रांचा संकल्प त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com