Pune News : तुमच्या मुलाच्या शाळेची मान्यता तपासून घ्या; पुण्यातील 'या' शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार

मनपाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील काही शाळा अनधिकृत असल्याची यादी जाहीर करत पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी या शाळांना मान्यता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्रुटी पूर्तता न करणाऱ्या शाळा चालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

शाळेची मान्यता तपासून निर्णय घ्या...

मनपाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असं सांगण्यात आलं आहे. या यादीत शहरातील विविध भागांतील 13 शाळांचा समावेश आहे. यामध्ये बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोणीकाळभोर, उंड्री आदी परिसरातील शाळांचा समावेश आहे.
मनपाच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, या शाळा अनधिकृत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश घेतल्यास पुढील शैक्षणिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी अधिकृत शाळांचीच निवड करावी, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : 9 वर्षांची लेक रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत होती, बापाने राहतं घर दिलं पेटवून; जन्मदाता का झाला वैरी?

संबंधित शाळा चालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही त्रुटी असतील तर त्या शाळा नियमित करण्यात येतील. परंतु त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित शाळा चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे

  1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल बिबवेवाडी पोलीस स्टेशन जवळ चिंतामणी नगर, पुणे
  2. महात्मा गांधी प्रशाला प्लॉट न. 52, लेन न. 2B संजय पार्क, येरवडा, पुणे
  3. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ऍण्ड मक्तब, NIBM रोड कोंढवा खु पुणे
  4. सेंट व्ह्यू इन्टरनॅशनल स्कूल कोंढवा बु पुणे
  5. इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमंदवाडी रोड हडपसर पुणे
  6. आकांक्षा अ‍ॅकॅडमी स्कूल अजिंक्य डी. वाय. पाटील रोड लोहगाव पुणे
  7. एलोरा मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फौंडेशन आर्यन पब्लिक स्कूल मानाजी नगर नन्हे, पुणे
  8. लेगसी हाय स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
  9. शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल अश्रफ नगर कोंढवा बु पुणे
  10. ऑर्चीड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री ता. हवेली पुणे
  11. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कौसरबाग कोंढवा पुणे
  12. ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बु पुणे
  13. आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री पुणे