रेवती हिंगवे
Viral Video: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ऐन दिवाळीत एक मोठा ट्वीट बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मेधा कुलकर्णी यांच्या मते जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यात नमाज पठण केलं जात होतं. नमाज पठण काही मुस्लीम मुली करत आहेत असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला आहे. शिवाय या कृतीला त्यांनी विरोध दर्शवत त्यांनी रविवारीच शनिवार वाड्यात शिववंदनेचं आयोजन केलं आहे. त्यांच्या या व्हिडीओनंतर या मागचे सत्य काय याची चर्चा सुरू झाली आहे.
मेधा कुलकर्णी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की पुण्याचे वैभव – शनिवार वाडा! ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार, हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया सकल हिंदू समाज व पतित पावन संघटना असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या ट्वीटमुळे ट्वीस्ट निर्माण झाला आहे. शिवाय यातून वाद ही निर्माण होण्याची शक्यत आहे. मुस्लिम मुली शनिवार वाड्यात नमाज करत असल्याचा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी टाकला आपल्या X अकाऊंट वर टाकला आहे. असं असलं तरी हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबद्दल अस्पष्टता आहे. तरीही कुलकर्णी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. शिवाय त्यांनी आता हिंदू संघटनासह सामूहिक शिव वंदनेचे आवाहन ही केले आहे. तर दुसरीकडे या नमाज पठणाबाबत पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
त्यामुळे हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. किंवा त्याबाबतची तक्राही पोलीसात कुणी दिलेली नाही. शिवाय अशा ठिकाणी नमाज पठण करात येते का याबाबत ही स्पष्टता आलेली नाही. मात्र यावरून राजकारण मात्र पेटणार हे कुलकर्णी यांच्या ट्वीटवरून दिसत आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी ही यात आता उडी घेतली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या व्हिडिओची पुष्टी NDTV मराठी करत नाही.