Pune News :हिंजवडी आयटी पार्कला जाणारा रस्ता आता सुसाट; पुणे महापालिकेची मोठी कारवाई,वाचा काय घडलं?

Pune News : पुण्यातील वाकड परिसरातील अत्यंत गजबजलेल्या एका मुख्य रस्त्यावर रोजची होणारी वाहतूक कोंडी आता कायमस्वरूपी इतिहास जमा होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune News : वाकडमधील अत्यंत गजबजलेल्या दत्त मंदिर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे.
पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील वाकड परिसरातील अत्यंत गजबजलेल्या एका मुख्य रस्त्यावर रोजची होणारी वाहतूक कोंडी आता कायमस्वरूपी इतिहास जमा होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी प्रशासनाने आज (मंगळवार, 7 एप्रिल) मोठा निर्णय घेत कारवाईचा बडगा उगारला. यामुळे या भागातील श्वास मोकळा झाला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने ही धडक कारवाई केली. वाकडमधील अत्यंत गजबजलेल्या दत्त मंदिर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी म्हातोबानगर येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या शेकडो झोपड्यांवर महापालिकेने बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे 45 मीटर रुंदीच्या रस्ते विकासाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : पुण्यातील पावसाचं 'अरबी कनेक्शन'; कशामुळे आभाळ फाटलं आणि शहर बुडालं? वाचा सर्व कारणं )

अनेक वर्षांपासून रखडले होते काम

वाकडमधील दत्त मंदिर रोड हा अत्यंत महत्त्वाचा अंतर्गत रस्ता मानला जातो. हा रस्ता हिंजवडी आयटी पार्क आणि महामार्गाला जोडला जात असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याचे 45 मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने बराच काळ आधी केले होते. मात्र, म्हातोबानगर येथील झोपडपट्ट्यांमुळे हे काम रखडले होते. अखेर महापालिकेने या झोपडपट्टीतील नागरिकांचे कायदेशीररित्या पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर ही कारवाई केली आहे.

( नक्की वाचा : Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गात मोठा बदल, प्रमुख धार्मिक स्थळांचे अंतरही बदलले! वाचा सविस्तर )
 

वाहतूक कोंडीतून मिळणार कायमची सुटका

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अवजड मशिनरी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून या झोपड्या जमीनदोस्त केल्या. दत्त मंदिर रस्ता अरुंद असल्यामुळे येथे तासनतास वाहतूक कोंडी होत होती. आता रस्ता रुंद झाल्यामुळे आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या कारवाईमुळे वाकड परिसरातील वाहतुकीचे चित्र आता पूर्णपणे बदलणार आहे.
 

Topics mentioned in this article