सूरज कसबे
हिंजवडी येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता एका महिलेने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला, तिची सासू आणि मेहुणा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. याघटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरूणीनेही आरोपींवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून एका पुरुषाचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. ही बाब त्याच्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्यात अनेकदा वाद झाले. पती आणि त्याची प्रेयसी एकमेकांना भेटत होते, त्यामुळे पत्नीचा संशय अधिक बळावला होता. पत्नीने गर्लफ्रेंड पासून दूर रहावे अशी पतीला सांगितले होते. पण त्याचा काही एक असर त्याच्यावर होत नव्हता. त्यांच्यातील भेटणे सुरू होते. त्यामुळे पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.
त्यामुळे पत्नीने पतीच्या प्रेयसिला धडा शिवकवण्याचा निर्णय घेतला. ती आपली सासू आणि मेहुणा हे त्या तरुणीच्या ऑफिसबाहेर गेले. तिथून त्यांनी तुमचे कुरिअर आले आहे असा फोन करून तिला बाहेर बोलावले. बाहेर आल्यावर त्यांच्यात जोरदार वाद झाला. शिवाय तिला जबरदस्तीने गाडीत बसवून वाकड पोलीस स्टेशनला चल, असे सांगून तिला मारहाण केली. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलेने पीडितेला "माझ्या पतीसोबत पुन्हा दिसल्यास बघून घेईन," अशी धमकीही दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपींना समज दिली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.