
रेवती हिंगवे
गणेशोत्सव आणि पुणे हे एक समिकरण बनले आहे. या निमित्ताने काही ना काही नवीन देखावे आणि संकल्पना प्रत्येक वर्षी पुण्यातील काही आवलीया कलाकार घेऊन येत असतात. पुण्याच्या गणपतीची खासियत म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळा देखावा उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो. यावर्षी हीच परंपरा पुढे चालवत पुण्यातील गोखले नगर मधल्या गुरुदत्त तरुण मंडळाने भक्तांच्या मागणीनंतर हुबेहूब मंडळाच्या 54 वर्ष जुनी मूर्ती सारख्या 50 मुर्त्या बनवण्यात आल्या आहेत. ते ही 3D तंत्रज्ञानाचा वापर करून हे विशेष.
3D मूर्तीच स्कॅन आणि त्या नंतर त्याची प्रिंट करून तशीच्या तशी मूर्ती साकारण्याचं काम पुण्यातील इंद्रजीत जोशी नावाच्या अभियंत्याने केलं आहे. प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले एका ट्राय मोड स्कॅनिंग मशीनचा वापर केला जातो. ज्यामध्ये मूर्तीचा रंग, हात, त्याचे भाव सगळे स्कॅन केले जातात. दाग-दागिन्यांसाठी फक्त वेगळं स्कॅनिंग केलं जातं. ज्याने करून त्याचे बारकावे प्रत्यक्षात उतरतात. एका स्कॅनिंगला तीन ते चार तास लागतात. त्या नंतर एका शीटवर कंटिन्युड प्रोसेसमध्ये ते बनवले जाते.
मूर्ती तयार झाल्यानंतर त्याला डाय केले जाते. रंगाने आणि शाडू मातीने ते भरीव केले जाते. तर या 3D स्कॅनिंग टेक्नोलॉजीचा वापर करून ज्या मूर्त्या बनवल्या जातात. त्या बायोडिग्रेडेबल असतात. जणे करून निसर्गाचे नुकसान पण होत नाही असे इंद्रजीत जोशी यांनी सांगितले. तर नुसत्याच छोट्या मूर्त्या म्हणजे 15 इंचाच्या नाही तर 5 इंचाच्या लहानश्या मुर्त्या देखील बनवण्यात आल्या आहे.
Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?
ही संकल्पना गुरुदत्त तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष उदय महाले यांची आहे. त्यांनी सांगितले की टेक्नोलॉजीचा अनोखा वापर यावेळेस करण्यात आला आहे. “मोठ्या मूर्तीची हुबेहूब मूर्ती कलाकाराकडून होत नाही. 10-15 टक्के फरक तरी असतो. म्हणून यावेळेस आम्ही निर्णय घेतला की 3D तंत्रज्ञानाचा वापर करून भक्त्यांच्या मागणीनुसार आम्ही ते तयार करून घेऊ. या वेळेस फक्त 50 मूर्त्या करण्यात आल्या. कारण शाडू मातीला वाळायला वेळ लागतो,” असे उदय महाले यांनी NDTV मराठी शी संवाद साधताना सांगितले. लोकांना 54 वर्ष जुन्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world