जाहिरात

Pune News: हातात बॅग, सोबत गुंगीचं औषध, महिलेच्या डोक्यात भयंकर प्लॅन! पण एक चुक नडली अन् खेळ खल्लास

ही महिला नेमकी कुठून आली तिचे आणखी काही साथीदार शहरात सक्रिय आहेत का ? याआधी अशा घटनांमध्ये तिचा सहभाग होता का ? या प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.

Pune News: हातात बॅग, सोबत गुंगीचं औषध, महिलेच्या डोक्यात भयंकर प्लॅन! पण एक चुक नडली अन् खेळ खल्लास
  • पिंपरी चिंचवडमधील काळभोर नगरात बाळ चोरीसाठी फिरणाऱ्या महिलेला नागरिकांनी संशय आल्यावर रंगेहात पकडले
  • महिलेकडून धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे सापडल्याने पोलिस आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली
  • संशयित महिलेला नागरिकांनी चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले, तिची चौकशी सुरू आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सूरज कसबे 

एक तरुणी संशयास्पद पद्धतीने फिरत होती. तिच्यावर काही लोकांना संशय आला. मात्र ज्या वेळी तिला पकडलं गेलं त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्यांच्या पाया खालची वाळूच सरकली. पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरामध्ये बाळ चोरीच्या उद्देशाने वावरणाऱ्या एका महिलेला नागरिकांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त नागरिकांनी या महिलेला बेदम चोप दिलाच. शिवाय पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणीच्या झडतीत धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे यांसारख्या संशयास्पद वस्तू सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, काळभोर नगर परिसरात ही महिला संशयास्पदरीत्या फिरत होती. तिची हालचाल काहींना वेगळी वाटली. ती सहज वावरत नव्हती. ती सतत लहान मुलांकडे पाहात होती. तिचा कल पाहून स्थानिक नागरिकांना संशय आला. ती एका बाळाला पळवण्याच्या तयारीत असतानाच सतर्क नागरिकांनी तिला जागीच पकडले. महिला बाळ चोरण्यासाठी आल्याची खात्री लोकांना पटली. सर्व जणांनी मिळून तिला पकडण्याचं ठरवलं. लोकांची खात्री पटताच तिला पकडले. मग जमावाने तिला चांगलाच चोप दिला.

नक्की वाचा -  Badlapur News: झाडाचे आंबे तोडले, 15 वर्षाच्या मुलाला पालकां समोरच बदडले! मारहाणीचा थरार CCTV मध्ये कैद

झडतीत संशयास्पद साहित्य जप्त
नागरिकांनी जेव्हा या महिलेच्या बॅगेची तपासणी केली, तेव्हा सर्वांचेच पाय कापले. तिच्याकडे एक धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि एक स्प्रे आढळून आला. बाळ चोरताना बाळाला किंवा पालकांना बेशुद्ध करण्यासाठी तिने हे साहित्य जवळ बाळगले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या साहित्यामुळे ही महिला एखाद्या मोठ्या टोळीचा भाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत. या महिलेचा उद्देश काय होता याचा ही शोध आता पोलीस घेत आहेत. ही महिला पोलीसांच्या ताब्यात असून तिची चौकशी केली जात आहे. 

पोलिसांची भूमिका आणि तपास
पिंपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ही महिला मानसिक तणावाखाली असून त्यातून तिने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, तिच्याकडे सापडलेले साहित्य पाहता पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. ही महिला नेमकी कुठून आली तिचे आणखी काही साथीदार शहरात सक्रिय आहेत का ? याआधी अशा घटनांमध्ये तिचा सहभाग होता का ?  या प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.

नक्की वाचा - Do You Know: जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हाला माहित आहे का? उत्तर ऐकून थक्क व्हाल

पालकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोपी महिलेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संबंधित महिला मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. तिच्या मुलीच्या लग्नासाठी तिने कर्ज घेतले होते आणि कर्जदारांकडून तगादा वाढत होता. या दबावामुळे, अल्पवयीन मुलांना धमकावले किंवा भीती दाखवली तर पोलिस आपल्याला घेऊन जातील आणि कर्जाचा प्रश्न काही काळासाठी टळेल, असा गैरसमज करून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com