Pune News: घरात घुसून अत्याचार करणारा 'तो' कुरीअर बॉय तिच्या ओळखीचा, 48 तासानंतर 'असा' अडकला

एक अज्ञात व्यक्तीने डिलीव्हरी बॉय आहे, आणि पार्सल द्यायचे आहे असे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसाइटी मध्ये एका 22 वर्षीय IT मध्ये काम करणाऱ्या  एका अभियंतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.  बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता ही घटना घडली. पीडित तरुणी घरी एकटी असताना हा सगळा प्रकार घडला. ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्या कुरीअर बॉयने स्प्रेचा वापर करत तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ऐवढचं नाही तर मी पुन्हा येईन असं लिहून तो नराधम तिथून रफूचक्कर झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही बातमी वाऱ्यासारखी पुण्यात पसरली. पोलिसांनी गांभिर्य लक्षात घेवून तपासाची चक्र फिरवली. त्यासाठी 20 टीम तयार करण्यात आल्या. दोन संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आलं. पुण्यात पोलिसांच्या नाकावर टीच्चून या आरोपीने हा कांड केला होता. त्यामुळे त्याला शोधण्याचे आव्हान पोलिसां समोर होते. त्यांनी जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. त्यातून पोलिसांच्या हाती एक पुरावा लागला. त्या आधारे आज  दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान मुख्य आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं. त्याच्या प्राथमिक चौकशीतून  हा आरोपी आणि पिडीत तरूणी हे एकमेकांना ओळखत असल्याचे समरो आले आहे. पण पोलिसांनी याबाबत अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. आरोपीची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News : पुणे हादरलं! तरुणीवर घरात घुसून अत्याचार, कुरिअर बॉयची 'परत येईन' अशी धमकी

एक अज्ञात व्यक्तीने डिलीव्हरी बॉय आहे, आणि पार्सल द्यायचे आहे असे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो त्या तरुणीपर्यंत पोहोचला. ते कुरियर आपलं नाही असं तिने त्याला सांगितलं. पण तरी ही त्याने तिला सही करण्यास भाग पाडले. त्यासाठी दरवाजा उघडला असता त्याने आत घुसून, पीडित महिलेच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यात ती तरुणी बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sushil Kedia: 'मी प्रतिज्ञा करतो मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, ठाकरेंना भिडणारा तो उद्योजक कोण?

बलात्कार केल्यानंतर तो आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने घटनेनंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला. शिवाय मी परत येईन असे टाईप करुन ठेवले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस या घटनेनं हादरून गेले. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात गुन्हेगार नवनविन गोष्टी गुन्हा करण्यासाठी वापरत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी चंग बांधला. वीस टीम त्यासाठी तयार करण्यात आल्या. शेवटी सीसीटीव्हीच्या नजरेतून हा आरोपी वाचू शकला नाही. विशेष म्हणजे तो तिला ओळखत होता. आता चौकशीतून तो काय खुलासे करता याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Advertisement