
Pandharpur Ashadhi Wari 2025 : पंढरपूर आषाढी वारीला सुरुवात झाली असून बुधवारी म्हणजेच 18 जून 2025 रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होता. गुरुवारी म्हणजेच 19 जून रोजी या पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. पालखीचा इनामदार वाड्यात मुक्काम असताना संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा संपन्न झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते पादुकांचे पाद्य पूजन करून आरती झाली.
नक्की वाचा: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025 । Sant Tukaram Maharaj Palkhi 2025 Sohla and Route
महापुजेनंतर पालखीचे प्रस्थान
तुकाराम महाराजांच्या शासकीय महापूजेच्या वेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे (Pandharpur Ashadhi Wari 2025 ), ह.भ.प वैभव मोरे, ह.भ.प दिलीप मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते. दर्शन व पूजेनंतर मान्यवरांचा मंदिर संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. महापुजेनंतर पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले.
नक्की वाचा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक
कधी आहे आषाढी एकादशी? (When Is Ashadhi Ekadashi 2025)
तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर गुरुवारी म्हणजेच 19 जून रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून, पंढरपूरच्या वारीत ( Pandharpur Ashadhi Wari 2025 ) सहभागी होणाऱ्या सर्व प्रमुख पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होऊ लागले आहे. 5 जुलै रोजी सगळ्या पंढरपुरात पोहोचतील. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आणि जुलै पालखी पंढरपुरात पोहोचेल. 5 ते 9 जुलै दरम्यान पंढरपुरात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी, दहा तारखेला पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीचा प्रवासाला निघेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world