यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Gold-Silver Rate Today: साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे.अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो.याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे.
ग्राहकांकडून सोने,चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे.दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली
पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो.अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे.राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या-चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं,असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये काँग्रेस बैठकीत राडा, नगरसेविकेनं जिल्हाध्यक्षांच्या कानशिलात लगावली, काय घडलं?
काय आहेत सोन्या-चांदीचे आजचे दर?
- सोने (24 कॅरेट) : अंदाजे 1,53,000 प्रति 10 ग्रॅम
- सोने (22 कॅरेट) : अंदाजे 1,42,000 प्रति 10 ग्रॅम
- चांदी : अंदाजे 2,57,000 प्रति किलो
* सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा
* महिलांचा विशेष सहभाग
* दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी