Kalyan Congress Meeting News : कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना भर बैठकीत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेत शनिवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक पदाधिकारी पुढे आल्याने पक्षात आधीपासूनच राजकीय हालचाली वाढल्या होत्या. काही दिवसांपूर्वी पदाधिकारी पलक वर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन संघटनात्मक कामकाजासह जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर इच्छुकांमध्ये हालचाल वाढली होती.
जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी नगरसेविकेला शिवीगाळ केली
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान नाश्त्याच्या व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्याने नगरसेविका कांचन कुलकर्णी यांना सांगितले की, जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी त्यांच्याबद्दल शिवीगाळ केली.ही माहिती मिळताच संतप्त झालेल्या कांचन कुलकर्णी यांनी थेट पातकर यांच्या भर बैठकीतच कानशिलात लगावली.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात भीम ज्योत कार्यक्रमात ‘बूट' वाद; दोन आमदारांवर आरोप, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
या घटनेनंतर बैठकीत एकच गोंधळ उडाला.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्तेही हैराण झाले. एका महिला नगरसेविकेला जिल्हाध्यक्षांकडून शिवीगाळ झाली असेल,तर ते कितपत योग्य आहे,असा सवालही काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान,याप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राजा पातकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.या घटनेमुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Washim News: वाशिममध्ये उष्माघाताचा पहिला बळी, गावकरी हळहळले, तरुण हळदीच्या शेतात उतरला अन् काही वेळातच..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world