पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालसह सर्व 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

विशाल अग्रवालच्या घराचे CCTV फुटेज, मोबाईल, रजिस्ट्रार ताब्यात  घेण्यात आलं आहे. मोबाईलचा DVR चेक करण्यासाठी विशाल अग्रवाल सामोरं असणे महत्त्वाचं आहे.  विशाल अग्रवाल याच्यावर कलम 420 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे.  

Advertisement
Read Time: 2 mins

प्रतीक्षा पारखी, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व सहा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. सर्वांना आज 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींची पोलीस कोठडी आज संपली होती. शिवाजीनगर न्यायालय परिसरात आज कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. कारण दोन दिवसांपूर्वी न्यायालयात आणलं जात असताना आरोपीवर शाई फेक झाल्याच्या प्रकार समोर आला होता. 

आरोपींची नावे

1) विशाल अग्रवाल ( मुलाचे वडील)
2) प्रल्हाद भुतडा ( कोझी हॉटेलचा मालक)
3) सचिन काटकर ( कोझी हॉटेलचा व्यवस्थापक)
4) संदीप सांगळे ( ब्लॅक बारचा मालक)
5) नितेश शेवाणी (हॉटेल कर्मचारी)
6) जयेश गावकर (हॉटेल कर्मचारी)

विशाल अग्रवालच्या घराचे CCTV फुटेज, मोबाईल, रजिस्ट्रार ताब्यात  घेण्यात आलं आहे. मोबाईलचा DVR चेक करण्यासाठी विशाल अग्रवाल सामोरं असणे महत्त्वाचं आहे.  विशाल अग्रवाल याच्यावर कलम 420 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे.  

घराच्या सीसीटीव्ही फुटेजमधून त्या दिवशीचं CCTV फुटेज गायब आहे. कोणाच्या मेंबरशीपवर या मुलाला बारमध्ये प्रवेश मिळाला. मुलाने जे पैसै खर्च केले त्यांचे अकाउंट डिटेल्स मिळाले नाहीत. मुलाने दारूसोबत अजून काही सेवन केलं आहे का? याचा तपास पोलीस घेत आहेत. 
 
Advertisement
Topics mentioned in this article