Pune News: पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली, 14 ते 15 जण ढिगाऱ्या खाली अडकले, बचावासाठी जवान धावले

पिंपरी चिंचवड इथे इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे 

सध्या पुणे आणि संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्याच वेळी शहरातील एक इमारत पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली आहे. शहराच्या मोशी कचार डेपो जवळ ही मारत होती. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या इमारतीत लोक होते. इमारत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्या खाली हे लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि पिंपरी चिंचवड अग्निशमन दल यांना देण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात आता ही दोन मजली इमारत कोसळली आहे. ही दुमजली इमारात शहराच्या मोशी कचार डेपो जवळ आहे. इमारत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तातडीने बचाव कार्य ही सुरू केले आहे. त्यांच्या सोबतीला आपत्ती निवारणाचे पथक ही दाखल झाले आहे. सध्या संयुक्त पणे तिथे बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: नवले ब्रिजवरून गाडी चालवण्यासाठी आता नवा नियम, तर पालखी सोहळ्यानिमित्त आरटीओ आळंदी रस्ता...

सध्या जवानां मार्फत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. परिसरात या घटनेनंतर भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्यात जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन तिन दिवसांपासून मुंबई, रायगड, ठाणे पालघरसह पुण्याला पावसाने झोडपले आहे. पावासाचा जोर पाहाता वारीचा पालखी मार्ग ही बदलण्यात आला आहे. पावसाची स्थिती पाहाता प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त आणि उपाययोजना केल्या आहे. शिवाय  वेळोवेळी पावसाचे अलर्ट ही नागरिकांनी दिले जात आहे. 

नक्की वाचा - Pune News: मिसिंग लिंक अन् सुरक्षेचे 13 प्रश्न! 'या' नेत्याने एका फटक्यात फेटाळला होता मिसिंग लिंक प्रस्ताव

दरम्यान पिंपरी चिंचवड इथे इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. दुपारच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू असतानाच ही इमारत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. सध्या तरी कोणती ही अप्रिय घटना घडलेली नाही. शिवाय जखमींबाबतही कोणही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र तातडीची उपाय योजना म्हणून घटना स्थळी अँम्ब्यूलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.  स्थानिक लोकांनी ही या भागात बचाव कार्यात मदत करण्यास सुरूवात केली आहे.