Pune Heavy Rain : पुढील 48 तास पुण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबरला पुण्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 28 सप्टेंबरला रेड अलर्ट तर 9 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 48 तास धोक्याचे असून पुणेकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्ग 27 सप्टेंबरच्या रात्रीपासून वाढवण्यात आला आहे. घाटमाथ्यावर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती आहे. खडकवासला धरणातून रात्री 9 वाजेपासून 6 हजार 864 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जर पावसाने असाच जोर धरला तर विसर्ग वाढवण्याची शक्यता पाट बंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत राज्य मेघ गर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात याचा परिणाम दिसू शकतो. पुढे 2 आणि 3ऑक्टोबरलाही राज्यात पावसाची परिस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाला तडाखा बसल्याची माहिती हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नसल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Rain Update : Emergency असेल तरच घराबाहेर पडा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुफान पावसाचे संकेत
संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संबधित जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-
धाराशीव ०२४७२-२२७३०१, बीड-०२४४२-२९९२९९, परभणी- ०२४५२-२२६४००, लातूर - ०२३८२- २२०२०४, रत्नागिरी- ७०५७२२२३३, सिंधुदुर्ग-०२३६२- २२८८४७, पुणे- ९३७०९६००६१,सोलापूर- ०२१७-२७३१०१२, अहिल्यानगर ०२४१-२३२३८४४, नांदेड-०२४६२-२३५०७७, रायगड- ८२७५१५२३६३, पालघर- ०२५२५- २९७४७४, ठाणे- ९३७२३३८८२७, सातारा- ०२१६२- २३२३४९, मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२- ६९४०३३४४.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २४X७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांक:- ०२२-२२०२७९९०,०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.