जाहिरात

Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

काही दिवसांपूर्वी कार्यकाळ संपण्याआधीच महाराष्ट्राच्या गृहविभागाकडून त्यांची अचानक बदली करण्यात आली होती. 

Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती
पुणे:

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (Pune Rural Superintendent of Police Pankaj Deshmukh) यांच्या बदलीला कॅटकडून (केंद्रीय प्रशासकीय न्यायधिकरण) स्थगिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात देशमुख यांची मुदती आधी बदली झाली होती. पंकज देशमुख सध्या पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून (CID) बदली झाल्यानंतर 31 जानेवारी 2024 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. कार्यकाळ संपण्याआधीच महाराष्ट्राच्या गृहविभागाकडून त्यांची अचानक बदली करण्यात आली होती. 

त्यांची मुंबईत पोलीस उपायुक्त (DCP) या पदावर नियुक्त करण्यात आली होती. देशमुख यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) याबाबत याचिका दाखल केली होती. कॅटने तातडीच्या सुनावणीदरम्यान बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. CAT च्या निर्णयामुळे देशमुख 19 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील.  ट्रिब्युनलने महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार, देशमुख यांनी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही हे अधोरेखित केले. 

Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, पुण्यातील जुना मोहरा हेरला!

हे ही वाचा - Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, पुण्यातील जुना मोहरा हेरला!

कोण आहेत पंकज देशमुख? 

- 2011 च्या महाराष्ट्र केडरमध्ये ते आयटी अभियंता ते आयपीएस अधिकारी बनले. 
- देशमुख यांच्या कारकिर्दीची वाटचाल उल्लेखनीय आहे. 
- त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. जिथे त्यांनी कायद्याची अंमलबजावणी आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com