जाहिरात

Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, पुण्यातील जुना मोहरा हेरला!

भाजपचे माजी आमदार बापू पठारे (Bapu Pathare ) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, पुण्यातील जुना मोहरा हेरला!
पुणे:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. शरद पवारांनी येथील आपला जुना मोहरा हेरला आहे. (Sharad Pawar)

भाजपचे माजी आमदार बापू पठारे (Bapu Pathare ) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणूक लढवणार आणि तुतारीवरच लढवणार, असं बापू पठारे यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात माजी आमदार बापू पठारे निवडणूक लढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं

हे ही वाचा - Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं

गणपती मंडळाला भेटी देत असताना पहिल्याच दिवशी तुतारीवर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मतदान करताना तुतारीवर करण्याचं  आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. सध्या बापू पठारे भाजपमध्ये आहेत. 2019 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगरसेवक आणि महानगरपालिका स्थायी समितीच अध्यक्षपद भूषवलं आहे. 2009 ला वडगाव शेरी मतदार संघातून ते विजयी झाले होते. त्यानंतर 2014 साली भाजपच्या जगदीश मुळीक यांनी बापू पठारे यांचा पराभव केला होता. 

Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं

हे ही वाचा - Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं

गेल्या काही दिवसांपासून बापू पठारे भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतील, अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनीच याबाबत स्पष्ट केलं आहे. वडगाव शेरी मतदार संघामध्ये पठारे तुतारी हातात घेणार आहेत. परिणामी महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा अन्यथा दुसऱ्या उमेदवारासाठी काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

सांगलीतील गावात मशिदीत बाप्पा विराजमान, या प्रथेचं अन्  पुण्याच्या पानशेत धरणाचं आहे कनेक्शन 

नक्की वाचा - सांगलीतील गावात मशिदीत बाप्पा विराजमान, या प्रथेचं अन्  पुण्याच्या पानशेत धरणाचं आहे कनेक्शन

वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पोर्शे अपघात प्रकरणात मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे महायुतीतील फार्मूल्यानुसार टिंगरेना संधी मिळणार की भाजप वडगाव शेरी आपल्याकडे खेचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं
Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, पुण्यातील जुना मोहरा हेरला!
aam aadmi party releases first 20 candidate list for haryana-assembly elections arvind kejriwal rahul gandhi
Next Article
हरियाणामध्ये काँग्रेस-आपमधील बोलणी फिस्कटली; आपकडून 20 उमेदवारांची यादी जाहीर