जाहिरात

Pune News: : पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; 'या' तालुक्यांमधील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

Pune News:  पुणे जिल्ह्यात दमदार पावसाचा हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत मोठा पाऊल उचलले आहे.

Pune News: : पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार;  'या' तालुक्यांमधील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर
Pune News:  पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News:  पुणे जिल्ह्यात दमदार पावसाचा हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत मोठा पाऊल उचलले आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शाळांबाबत प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  मंगळवार 7 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नेमका हा निर्णय कोणत्या भागांसाठी लागू आहे आणि विद्यार्थ्यांना कधीपर्यंत दिलासा मिळाला आहे, याची सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

जिल्ह्यातील 'या' तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घाट माथ्यावर आणि विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवार 7 जुलै 2026 रोजी पुणे काही तालुक्यांमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये 7 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, काय आहे कारण? )
 

सर्व माध्यमांच्या शाळा आणि अंगणवाड्या राहणार बंद

प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, वर नमूद केलेल्या तालुक्यांमधील सर्व अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, आश्रमशाळा, खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा तसेच सर्व इंग्लिश मिडियमच्या शाळा मंगळवारी पूर्णपणे बंद राहतील. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मात्र, शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात मदत करण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, नदी-नाले आणि दरड प्रवण क्षेत्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे शहरातील 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी

एकीकडे जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असताना, दुसरीकडे पुणे महापालिका हद्दीतील तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत पूर्ण सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सुट्टी केवळ पावसाच्या तीव्रतेमुळे नाही, तर त्याला आषाढी वारीची आणि आपत्कालीन परिस्थितीची जोड आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून लाखो वारकरी पुण्याच्या दिशेने येत आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्या हजारो वारकऱ्यांची आणि भाविकांची राहण्याची सोय पुणे महापालिकेने आपल्या 101 शाळांमध्ये केली आहे. वारकऱ्यांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी या शाळा रविवारपर्यंत निवासासाठी वापरल्या जाणार असल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी वाढवून देण्यात आली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com