Sinhagad Fort : 5 दिवसांपासून सिंहगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी; कारण काय? आणखी किती दिवसांची प्रतीक्षा?

30 मे पासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

पावसाची सुरुवात होताच गडवेड्यांची पाऊलं सिंहगडाच्या दिशेने वळतात. मुंबई-पुण्यापासून जवळ असलेला सिंहगड किल्ल्यावर एक दिवसीय सुट्टी घालविण्यासाठी अनेकजण आग्रही असतात. त्यात पावसाच्या दिवसात सिंहगडावरुन सुंदर निसर्गासोबत कांदा भजी खाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 30 मेपासून सिंहगडावर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकासाठी महत्वाची बातमी असून सिंहगड किल्ला आज आणि उद्या बंद राहणार आहे. गडावरील अतिक्रमण हटविण्याचं काम अद्यापही सुरू आहे.

नक्की वाचा - Purandar Airport : पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा? शेतकऱ्यांची एकरी एवढ्या कोटींची मागणी

त्यामुळे आज आणि उद्याही कारवाई सुरूच राहणार आहे. 30 मे पासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. आणखी दोन दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दरम्यान किल्ला केव्हा सुरू होणार याबाबतची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.