गणोशोत्सवासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. त्यासाठी कोणी कोकण रेल्वेचा आधार घेत तर कोणी लालपरीतून आपलं गाव गाठतं. काही खाजगी गाड्यांनी गावाकडे जात असतात. मात्र सध्या मुंबई गोवा हायवेची स्थिती पाहात निघायचे कधी आणि पोहोचायचे कधी असा प्रश्न चाकरमान्यां पुढे असतो. त्यात काही जण मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून जातात. पण तीथे ही ट्राफीक ही समस्या असतेच. अशा वेळी कोकणातल्या चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी एक गोष्ट समोर आली आहे. त्यानुसार कोकणात एक तासात पोहोचणे शक्य होणार आहे. त्याचे कारण आहे पुण्याहून सिंधुदुर्गसाठी सुरू होणारी विमान सेवा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गणपतीला कोकणा जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता फ्लाय 91 या विमान कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 पासून म्हणजेच गणेश चतुर्थी पूर्वी सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला शुभारंभ होणार आहे. पुण्यातून सिंधुदुर्गात म्हणजेच चिपी विमानतळावर आता तासाभरात पोहोचता येणार आहे. आठवड्यातून दोन वेळा विमान फेरी ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुण्या वरून 8.05 ला विमान सुटून 9.10 वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल. तर सिंधुदुर्ग येथून 9.30 ला सुटून 10.35 ला पुणे येथे पोहोचेल अशी माहिती, विमानसेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर प्रवाशांना देण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
कोकणात सिंधुदुर्गात जाण्यासाठी मुंबईहूनही विमान सेवा आहे. आता पुण्यातूनही ही सेवा सुरू झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतून चिपी बरोबरच गोव्यासाठी ही विमान जातात. त्यामुळे जर चिपीचे तिकीट उपलब्ध नसेल तर अनेक जण गोव्याला जावून कोकणात येणे पसंत करतात. आता त्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यानुसार पुण्यातून ते एका तासात कोकणात जावू शकतात. गणपतीत खाजगी गाड्यांच्या तिकीटाचे दर हे गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे विमानाने जाणे अधिक जण पसंत करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोकणात जाण्यासाठी अनेक जण मुंबई गोवा महामार्गाचा वापर करतात. पण त्या रस्त्याची सध्याची स्थिती तेवढी चांगली नाहीत. रस्ता चांगला करावा यासाठी वारंवार आंदोलने झाली. त्यात खाजगी गाड्यांचे दरही जास्त असतात. महामार्गावर होणारे ट्राफीक हे पण समस्या आहेच. रेल्वेलाही प्रचंड गर्दी असते. अशा वेळी अनेक जण विमान प्रवासाकडे वळत आहेत. त्यामुळे फ्लाय 91 या विमान कंपनीने हा निर्णय घेतला आहे.