Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल; 'हे' आहेत पर्यायी मार्ग पाहा

Pune Traffic News: पुण्यात लाल महाल ते ससून हॉस्पिटल दरम्यान निघणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे

पुणे शहरात आज आयोजित एका भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत पुणे वाहतूक पोलिसांकडून आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मोर्चामुळे मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोर्चाचा मार्ग कसा असेल?

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा लाल महाल येथून सुरू होईल. त्यानंतर दारूवाला पूल, नरपतगिरी चौक, बोलाई माता मंदिर, ससून हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मोर्चाची सांगता होईल.

Advertisement

वाहतूक बदलावाचे मुख्य मार्ग आणि पर्यायी रस्ते 

मोर्चाच्या मार्गावरील गणेश रोड, केळकर रोड, शिवाजी रोड आणि नेहरू रोड या प्रमुख मार्गांवर गरजेनुसार वाहतूक वळवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पोलिसांनी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. 

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A'

लक्ष्मी रोडवरील वाहतूक

लक्ष्मी रोडने जाणाऱ्या वाहनधारकांनी दारूवाला पूल ते डुल्या मारुती मार्गे इच्छित स्थळी जावे.

गणेश रोडसाठी पर्यायी मार्ग

गणेश रोडऐवजी लाल महाल, फडके हौद, सूर्या हॉस्पिटल ते 15 ऑगस्ट चौक या मार्गाचा वापर करावा. 

केळकर रोडसाठी पर्यायी मार्ग

एबीसी (ABC) चौक, फुटका बुरुज, सूर्या हॉस्पिटल मार्गे प्रवास करावा

शिवाजी रोडसाठी पर्यायी मार्ग

जंगली महाराज (JM) रोड, नदीपात्र रस्ता आणि टिळक रोडचा वापर करावा

(नक्की वाचा-  Salman Khan Backs CJP: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा CJP आंदोलनाला पाठिंबा! "पेपर लीक हा गंभीर विषय, पण...")

नेहरू रोडसाठी पर्यायी मार्ग

गणेश रोड तसेच बॅनर्जी चौक, नेहरू मेमोरियल मार्गे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मोर्चामुळे मध्यवर्ती पुण्यात वाहनांची संथ गती आणि गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
 


Topics mentioned in this article