मेट्रो आणि रस्त्यांची कामं, वाढती लोकसंख्या परिणामी वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुण्यात मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. पुण्यातील सिंहगड रोडसह अनेक रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेत काही किलोमीटर अंतर गाठण्यासाठी तासन् तास वाट पाहावी लागते. पुण्यात नोकरी आणि शिक्षणासाठी दरवर्षी देशभरातील तरुणवर्ग मोठ्या संख्येने दाखल होत असतो. या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य नसल्याने येथील वाहतुकीचा पर्यायी मार्ग सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याची गरज लक्षात घेत पुण्यातील सगळ्यात वर्दळीचा परिसराला आता भुयारी मार्ग मिळणार आहे. शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा या भुयारी मार्गाच्या DPR ला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्ता यावर रोजचे सुमारे 20 हजार वाहने ये जा करीत असतात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा - Pune News : पुणेकरांनी फस्त केले 4 कोटींचे आंबे, तब्बल 45 हजार डझन आंब्यांची विक्री
या रस्त्यांवर पूल बांधणे किंवा रस्ता रुंदीकरण शक्य नसल्याने भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून अखेरीस हा DPR तयार होऊन पुढील निर्णय होईल असंही सांगण्यात आलं आहे. पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे मेट्रो च्या सल्ल्याने हा डीपीआर तयार करण्यात येत आहे
कसा असेल भुयारी मार्ग?
- शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा असा असेल रस्ता
- 22 मीटर म्हणजेच 72 फूट जमिनीखालून हा रस्ता तयार करण्यात येईल
- चारपदरी हा रस्ता असेल तर या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक शक्य
- भूमीगत रस्ता असल्याने मेट्रोची मदत देखील घेण्यात येणार