Pune News : 7 दिवस पुण्यातील वाहतूक मार्गात बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

२४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिरुर ते पाबळ रोडवरील (राज्य महामार्ग क्र.५४) वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार हा कार्यक्रम मौजे रामलिंग, ता. शिरुर येथे होत असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भक्तगणाच्या सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाहतूक वळविण्यात येणार आहे. भक्तगणांना आपली वाहनं वाहनतळ ठिकाणी पार्क करुन कार्यक्रम स्थळी पायी जाता येणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 1.2 लाख प्रवाशांना मिळणार 5.2 कोटींचा रिफंड, कारण काय?

वाहतूक मार्गात बदल...

पाबळ रोड, शिरुररोडवरुन रामलिंगकडे जाणारी वाहतूक अग्निशामक केंद्र चौक, शिरुर येथून नवीन नगरपालिका रोड-जुना अहिल्यानगर पुणे हायवे रोड-बरला आर्टस शेजारील बगाड रोड ते बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे रामलिंगकडे जातील.

मौजे रामलिंगकडून शिरुरकडे जाणारी वाहतूक बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग बगाड रोड ते बरला आर्टस शेजारुन जुना पुणे अहिल्यानगर हायवे रोडला मिळून शिरुरमध्ये जाईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केलं आहे.

Topics mentioned in this article