Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ फेब्रुवारी रोजी गँस टँकर अपघातनंतर साधारण ३२ तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यादरम्यान प्रभावित झालेल्या किमान १.२ लाख वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व वाहन चालकांना लवकर टोल रिफंड मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास निगमच्या अधिकाऱ्यांनुसार, या सर्व वाहन चालकांना एकूण ५.१६ कोटींचा निधी परत मिळणार आहे. हा रिफंड एक्सप्रेसवेसह पुणे-बंगळुरू राष्ट्रीय राजमार्गावर वसुल केलेल्या टोलवरही लागू असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, या अपघातानंतर टोल वसुली रोखण्याचे निर्देश जारी करण्यात आले होते. मात्र तरीही ज्या वाहनांच्या फास्टटॅगवरुन निधी कापला गेला, त्याचा डेटा एकत्र करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात ही रक्कम संबंधित वाहनचालकांच्या फास्टटॅग खात्यात जमा करण्यात येईल.
परतफेडची प्रक्रिया सुरू...
या घटनेनंतर महामंडळाने त्यांच्या सवलती देणाऱ्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून सविस्तर माहिती मागितली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत टोल प्लाझाचे बॅरियर पूर्णपणे उघडले जात नाहीत, तोपर्यंत काही व्यवहारांमध्ये स्वयंचलित प्रणालीद्वारे FASTags कापले जाऊ शकतात. अशी सर्व प्रकरणे ओळखली गेली आहेत आणि परतफेड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रिफंड थेट डिजिटलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
प्रभावित वाहन चालकांना त्यांचे पैसे परत करणं प्राथमिकता...
३ फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ गॅस टँकर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. हजारो वाहनांच्या ४० ते ५० किलोमीटरपर्यंत रांगा होत्या. अनेक प्रवाशांना तासन् तास पाणी, जेवणाची व्यवस्था नव्हती. स्वच्छतागृह जवळ नसल्याने महिलांचे हाल झाले. ही परिस्थिती पाहता प्रशासनाने टोल वसुली अस्थायी पणे रोखण्याचा निर्णय घेतला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world