Navale Bridge Accident: पुणे शहराला शिस्तबद्ध वाहतुकीची नवी ओळख देण्यासाठी आणि वाढते अपघात (Accidents) रोखण्यासाठी आता प्रशासनाने (Administration) कंबर कसली आहे. शहरातील वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई (Strict Action) करण्याचे थेट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. नवले पुलाजवळ नुकताच झालेला गंभीर आणि दुर्दैवी अपघात (Navale Bridge Accident) पाहता, या मार्गावर तातडीने लघुकालीन (Short-term) आणि दीर्घकालीन (Long-term) उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
नवले पुलाच्या अपघाताची तात्काळ चौकशी
विधानभवनात पुणे शहरातील वाहतूक सुधारणांवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत डॉ. पुलकुंडवार बोलत होते. नवले पुलाजवळील गंभीर अपघाताची कारणे शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी सुरू करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या मार्गावरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय, तातडीने अमलात आणावे लागतील, यावर त्यांनी भर दिला.
नवले पुलाचे पुन्हा सर्वेक्षण
सेव्ह लाईफ फाउंडेशनने सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी नवीन कात्रज बोगदा (Katraj Tunnel) ते नवले पुलादरम्यान (Navale Bridge) होणाऱ्या अपघातांवर एक सविस्तर अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा मोठा अपघात झाल्याने, डॉ. पुलकुंडवार यांनी फाउंडेशनला पुन्हा एकदा सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने या मार्गाचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल दोन आठवड्यांच्या आत सादर केला जाईल असं आश्वासन सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक पियुष तिवारी यांनी दिलं.
( नक्की वाचा : Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या )
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी डॉ. पुलकुंडवार यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दंड आकारला जावा. एवढंच नव्हे, तर जर एखाद्या व्यक्तीने 3 पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर नियमानुसार त्याचा वाहनचालन परवाना (Driving License) निलंबित करण्याची आणि वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास तो जप्त करण्याचीही कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते सुरक्षेसाठी दरमहा आढावा
रस्ते सुरक्षेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, मागील बैठकांत सुचवलेल्या उपायांची कामे पूर्ण झाली आहेत की नाहीत, याची खात्री करावी, असेही आयुक्तांनी सांगितले.
तसेच, रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेवर तो रस्ता सुस्थितीत (Well-maintained) ठेवणे, आवश्यक उपाययोजना करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे, याची थेट जबाबदारी असेल. जर रस्ता चांगल्या स्थितीत नसेल, तर संबंधित यंत्रणेवर जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) यांच्याकडून कारवाई केली जाईल. महामार्गांवर आवश्यक असलेल्या ठिकाणी रम्बलर्स (Rumblers), वाहतूक चिन्हे (Traffic Signs), फलक (Boards) आणि बॅरियर्स (Barriers) तात्काळ लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वॉर्डन्स देण्याची जबाबदारी
पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे, परंतु तोपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार, रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेने वाहतूक नियमनासाठी (Traffic Management) ट्रॅफिक वॉर्डन्स पुरवण्याची जबाबदारी घ्यावी, असेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.