जाहिरात

Pune News : पुण्यातील 'या' महिलेची शहरभर होतेय चर्चा, जे कोणालाच जमलं नाही ते धगधगत्या उन्हात करून दाखवलं

भीषण उन्हाच्या झळा फक्त माणसांनाच नाही,तर अबोल पशु-पक्ष्यांनाही सोसाव्या लागत आहेत.अशा परिस्थितीत शहरातील एका महिलेने दाखवलेल्या भूतदयेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pune News : पुण्यातील 'या' महिलेची शहरभर होतेय चर्चा, जे कोणालाच जमलं नाही ते धगधगत्या उन्हात करून दाखवलं
Pune Woman Inspirational Story
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Latest News Update : पिंपरी चिंचवड शहरात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून पारा चाळीशी पार गेल्याचं चित्र आहे. भीषण उन्हाच्या झळा फक्त माणसांनाच नाही,तर अबोल पशु-पक्ष्यांनाही सोसाव्या लागत आहेत.अशा परिस्थितीत शहरातील एका महिलेने दाखवलेल्या भूतदयेचे सर्वत्र कौतुक होत आहे.उन्हामुळे पाण्याचे स्त्रोत आटत असताना आणि अन्नासाठी पक्ष्यांची भटकंती होत असताना,या महिलेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा भिंतीवर ही महिला दररोज नित्यनियमाने पक्ष्यांसाठी दाणे आणि पिण्याच्या पाण्याची सोय करत आहे. महिलेची पशु-पक्षांबाबत असलेली धडपड नागरिकांनी व्हिडीओत कैद केली आहे. 

गॅलरीत किंवा घराबाहेर पक्ष्यांसाठी पाणी ठेवा

व्हिडीओत पाहू शकता की, महिला भिंतीवर पाणी आणि अन्न ठेवताच परिसरातील विविध पक्षी मोठ्या आवडीने तिथे गर्दी करत आहेत.उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी या पक्षांना हक्काचे ठिकाण मिळाल्याने या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. एकीकडे उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना, स्वतःची पर्वा न करता मुक्या जिवांसाठी धावून जाणाऱ्या या महिलेच्या कार्याची शहरात चर्चा आहे.माणुसकी अजून जिवंत आहे अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.ही कृती पाहता इतर नागरिकांनीही आपल्या गॅलरीत किंवा घराबाहेर पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे,असे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे.

नक्की वाचा >>Pune News : पुणेकरांनो घराबाहेर पडताय? पुण्यात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? समोर आली सर्वात महत्त्वाची अपडेट

तरुणांनीही या मोहिमेत सहभागी व्हा

केवळ अन्न-पाणी देऊनच ही महिला थांबली नाही,तर ती येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही या कार्यासाठी प्रोत्साहित करत आहे.तिने केलेल्या या छोट्याशा कृतीतून एक मोठा सामाजिक संदेश दिला जात आहे.वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून सिमेंटच्या जंगलात या मुक्या जीवांना निवारा आणि पाणी मिळणे कठीण झाले आहे.

नक्की वाचा >>  Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."

अशा वेळी प्रत्येकाने आपल्या घराच्या खिडकीत,बाल्कनीत किंवा गच्चीवर पाण्याचे छोटे भांडे ठेवल्यास शेकडो पक्षांचे प्राण वाचू शकतात. या माऊलीच्या कार्यामुळे प्रेरीत होऊन आता परिसरातील अनेक तरुणांनीही या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्धार केला असून पिंपरी-चिंचवडमध्ये खऱ्या अर्थाने माणुसकीचा झरा वाहताना दिसत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com