राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Pune Youth Missing in US : पुण्यातला सिद्धांत पाटील हा तरुण 6 दिवसांपासून अमेरिकेत गायब आहे. अमेरिकेतील एका छोट्याशा नदीत चेहरा धुण्यासाठी तो वाकला. त्यामुळे तो पाय घसरून पडला, अशी माहिती सिद्धांतसोबतच्या मुलांनी पालकांना दिलीय. आपला मुलगा सापडतोय ना त्याची कांही खबरबात यामुळे मुलाच्या आई वडीलांच्या डोळ्यातले पाणी थांबत नाही. या मुलाचा शोध घ्या असे पत्र शरद पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लिहलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुळचा जळगावचा असलेल्या सिद्धांतचं कुटुंब पुण्यातल्या पिंपळे निलखमध्ये स्थायिक झालंय. सिद्धांत त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक. तो 2021 साली अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला. 6 जुलै ला ( शनिवारी ) तो त्याच्या मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला. ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून तो नदीत पडला. सहा दिवस उलटले तरीही याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.
( नक्की वाचा : लोकल विस्कळीत झाल्याचा जीवघेणा फटका ! कल्याणच्या वास्तूविशारदाचा दुर्दैवी मृत्यू )
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनी देखील केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे. सिद्धांतचा शोध घेण्यात अमेरिकन प्रशासन दिरंगाई करत आहे, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला.
सिद्धांतचे वडील विठ्ठल पाटील यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलंय. पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर माझ्या मुलाला शोधावे अशी विनंती त्यांनी केली आहे.