Pune Zika virus : पुण्यात झिकाचा पाचवा रूग्ण, 28 वर्षीय गर्भवतीला लागण

गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात झिकाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

गेल्या आठवड्याभरापासून पुण्यात झिकाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात झिकाचा पाचवा रूग्ण आढळला असून 28 वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडवणे येथील तीन गरोदर महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन निगेटिव्ह आले आहेत. यातील एका महिलेला झिकाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. झिकाची लागण झालेली गर्भवती महिला बाधित रुग्णाच्या घराजवळ राहत होती. ही माहिती समोर आल्यानंतर आणखी तीन नमुने पाठवण्यात आले असून निकालाची प्रतीक्षा आहे.

यासाठी आरोग्य विभागाकडून अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. घरातील एअर कंडिशनर किंवा इतक कोणत्याही ठिकाणी बराच काळ पाणी साचून राहू नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहिमेला गती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत.

नक्की वाचा - अतिउत्साह नडला, एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

झिका वेगाने संक्रमण करणाऱ्या प्रकारातील आहे. गर्भवती महिलांसाठी विशेषतः धोकादायक आहे. आशियात आढळून येणारा झिका व्हायरसचे संक्रमण झालेल्या व्यक्तीमध्ये साधारणपणे सौम्य लक्षणे असतात. यामध्ये ताप येणे किंवा अंगावर गाठ येणे यांसारखी लक्षणं दिसतात. पण गर्भवती महिलांमध्ये हा व्हायरस गर्भाच्या वाढीवर गंभीर परिणाम करू शकतो. बाळाच्या माथ्यातील विकृती आणि अन्य गंभीर समस्यांना कारणीभूत होऊ शकतो. 

या प्रकारासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. पण लक्षणांवर पॅरासिटामॉल (एसिटामिनोफेन) सारख्या सामान्य औषधांद्वारे उपचार केला जाऊ शकतो, असं सांगितलं जातं. प्रसार रोखण्यासाठी मच्छरांपासून बचाव, शरीरभर कपडे घालणे आणि मच्छरदानीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. गर्भवती महिलांना झिका प्रभावित क्षेत्रांमध्ये प्रवास करण्यापासून दूर राहण्याची सल्ला देण्यात आला आहे.
 

Advertisement