जाहिरात
Story ProgressBack

अतिउत्साह नडला, एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

न्सारी कुटुंब हे पुण्यातील स्थानिक रहिवासी होते. पावसाचा आनंद घेण्यासाठी ते भुशी डॅमला गेले होते.

Read Time: 2 mins
अतिउत्साह नडला, एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

राहुल कुलकर्णी, पुणे 

लोण्यावळ्यातील भुसी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा मन सून्न करणारा व्हिडीओ समोर आला आहे. घटनेनंतर वाहून गेलेल्या महिला आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर काही वेळाने दोन जणांचे मृतदेह सापडले. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटर फॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं. येथूनच अन्सारी कुटुंबातील पाचजण वाहून गेले. मृत्यू झालेल्यांमध्ये 36 वर्षीय महिला, 13 वर्ष, 8 वर्ष, 4 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. 

(नक्की वाचा - ‘गूगल मॅप्स'मुळे काळ थेट पोहोचली नदीत; पुढे जे झालं ते थरकाप उडवणारं होतं)

अन्सारी कुटुंब लोणावळा भूशी डॅम परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते. डॅमच्या पाठीमागील जंगलात असलेल्या बॅक वॉटरवर पिकनिक करत होते. अचानक पाय घसरल्याने ते सर्वजण वाहून गेले. व्हिडीओतील दृष्यांनुसार, तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दिशेने दोर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहत्या पाण्यात एकमेकांना धरुन उभे राहिलेले सर्वजण वाहून गेले.    

(नक्की वाचा- हुंड्यासाठी छळ! 9 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, मग आईने उचललं टोकाचे पाऊल)

अन्सारी कुटुंब हे पुण्यातील स्थानिक रहिवासी होते. पावसाचा आनंद घेण्यासाठी ते भुशी डॅमला गेले होते. मात्र क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि कुटुंबातील 5 जण भुशी डॅममध्ये वाहून गेलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. लोणावळा शहर पोलीस पथक, वन्यजीव रक्षक, शिव दुर्ग रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य पूर्ण करण्यात आलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी; खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच निर्णय
अतिउत्साह नडला, एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO
IAS Sujata Saunik first woman Chief Secretary of Maharashtra took charge
Next Article
IAS सुजाता सौनिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, पदभार स्वीकारला
;