Punekar vs Outsiders Viral Post: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि एक प्रमुख शैक्षणिक तसेच आयटी हब असलेल्या पुणे शहरात सध्या 'पुणेकर विरुद्ध बाहेरून आलेले' असा नवा प्रादेशिक आणि भावनिक वाद चिघळताना दिसत आहे. या शाब्दिक द्वंद्वाचे प्रमुख केंद्र सोशल मीडिया बनले आहे. विरोधाची भावना केवळ भाषिक गटांपुरती मर्यादित न राहता, तिचा विस्तार महाराष्ट्राच्याच अन्य प्रांतांतील मराठी लोकांपर्यंत झाला आहे.
नक्की वाचा: Pune News: पुण्यात रातोरात काय घडलं? सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रम होणार, आयोजकांचा यू टर्न!
विदर्भ, मराठवाड्यातील लोकांना केलं जातंय लक्ष्य (Pune Poster Viral Post)
मराठवाडा आणि विदर्भ या महाराष्ट्रातीलच प्रांतांतून आलेल्या मराठी लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. या दोन्ही भागांतील लोकांना आता पुण्यात त्यांचे स्वागत नाही, असा संदेश या सोशल मीडियातील वादविवादातून दिला जात आहे.
दिवाळी सुट्टीनिमित्त पुण्यातून घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान पुण्यातील एका तरूणाने दाखवलेले एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "चालले परत येऊ नका", असा मजकूर या पोस्टरवर लिहिलेला आहे.
नक्की वाचा: 750 किलो कांद्याला मिळाला फक्त 664 रुपयांचा भाव; पावसाने शेत तुडवलं, शेतकऱ्याला रडवलं
पुण्यात सुरू झालं पोस्टर वॉर
बाहेरून आलेल्यांबद्दल असलेल्या या पोस्टरला दुसऱ्या एका तरुणाने पोस्टरनेच उत्तर दिलं आहे. "दिवाळीला जे पुणे सोडून जात आहेत, त्यांनी नक्की परत यावं. हे आपलं देखील शहर आहे. कोणाच्या बापाचे नाही", @abhayanjuu या इन्स्टा युजरने हा फोटो शेअर केला आहे.
वाद चिघळण्याची चिन्हे
पुणे हे केवळ महाराष्ट्रातील लोकांसाठीच नव्हे, तर देशभरातून शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी येणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. कोणत्याही भागात स्थानिक विरुद्ध बाहेरील हा वाद वाढणे एकात्मतेला आणि शांततेला बाधा ठरु शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.