Pune News : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रॉकेटच्या गतीने धावणाऱ्या पुण्याच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये आता मोठा बदल झाला आहे. एनरॉकने देशातील सात मोठ्या शहरांच्या संपत्तीवरुन एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यानुसार, पुण्यात रेसिडेन्शियल प्रॉपर्टीच्या विक्रीत तब्बल १५ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र गोष्टीतील ट्विस्ट इथ संपत नाही. एकीकडे एकूण विक्रीत घट झाली असली तरी दुसरीकडे डेव्हलपर्सच्या मिड आणि प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या प्रकल्पांचा शुभारंभ जोरात सुरू आहे. अशात जर तुम्हाला पुण्यात प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ही बातमी नक्की वाचा.
एनरॉकच्या रिपोर्टवरुन रियल इस्टेट तज्ज्ञ राहुल श्रीवास्तवने दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, कोविडनंतर देशभरातील मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीदारांचा एक वेगळा विचार दिसत आहे. ग्राहक आता भविष्याचा विचार करून फ्लॅट्समध्ये गुंतवणूक करीत आहे.
विक्रीत १५ टक्के घट, घाबरुन जाण्याची गरज का नाही?
एनरॉकच्या रिपोर्टनुसार, पुण्यातील घरांच्या विक्रीत १५ टक्के घट झाली आहे. बाजार क्रॅश होणं हे यामागील कारण नाही. तर एक कन्सॉलिडेशन फेज म्हणजेच बाजार स्थिर होण्याची प्रक्रिया आहे. कोविडनंतर २०२१ ते २०२५ दरम्यान पुण्यातील प्रॉपर्टीची किंमत वेगाने वाढत होती. वाढते व्याज दर, महागाई आणि महाग होणाऱ्या घरांमुळे पहिल्यांदा घर खरेदी करणारे आता अलर्ट झाले आहेत. खरेदीदार आता घाईघाईत निर्णय घेत नाहीत. आता ते बाजाराला समजून, रिसर्च करून आणि चांगल्या डीलची प्रतीक्षा करीत आहे. ज्यामुळे विक्रीच्या वॉल्यूममध्ये घट झाल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा - Pune News : पुणे-रायगडला जोडणारा महत्त्वाचा घाट महिनाभर बंद, पर्यायी मार्ग काय असेल?
मिड आणि प्रिमियम सेगमेंटमध्ये नवी घरं लॉन्च
या रिपोर्टमधील सर्वात मोठी बाब म्हणजे, विक्रीत घट झाली असली तरी बिल्डर्स टेन्शनमध्ये नाहीत. नव्या प्रकल्पाच्या लॉन्चिंग प्रकरणात मिड-प्रीमियम म्हणजे ५० लाख ते १ कोटी आणि प्रिमियम, १ कोटी ते २.५ कोटी किंवा त्यावरील सेगमेंट आता आघाडीवर आहे. डेव्हलपर्स आता लहान आणि स्वस्त फ्लॅट्स सोडून मोठ्या आणि लग्जरी स्पेस असणारे फ्लॅट लॉन्च करीत आहेत. कारण पुण्यातील खरेदीदारांचा विचार बदलत आहे. आज खरेदीदारांचा केवळ चार भिंती अपेक्षित नाही. तर त्यांना मोठ्या खोल्यांसह मॉडर्न एमिनिटीज उदा. क्लब हाऊस, स्विमिंग पूल, वर्क-फ्रॉम-होम फ्रेंडली स्पेस आणि हिरव्या गार भागात घर हवं आहे.
खरेदीदारांचा विचार का बदलला?
- पुणे मेट्रोचा विस्तार, रिंग रोड आणि नवीन लॉजिस्टिक्स व आयटी कॉरिडॉर्समुळे हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड आणि खराडी यांसारख्या भागांमध्ये प्रीमियम घरांची मागणी वाढली आहे.
- पुण्याच्या आयटी आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या हाय-अर्निंग प्रोफेशनल्स आता आपलं लाइफस्टाइल अपग्रेड करीत आहेत. यासाठी ते मोठ्या आणि प्रिमियम घरात पैसे गुंतवताना दिसत आहे.
- अनेक मायक्रो-मार्केट्समध्ये नव्या इन्वेंट्री सप्लाय वाढविण्यापेक्षा आता खरेदीदारांजवळ घासाघीस करण्याची ही एक चांगली संधी आहे. इतकच नाही डेव्हलपर्सदेखील खरेदीदारांना खूश करण्यासाठी ऑफर्स आणि कस्टमाइज्ड पेमेंट प्लान देत आहेत.
घर खरेदीदार आणि गुंतवणुकदारांना सल्ला...
खरेदीदाराच्या निर्णयाबाबत आम्ही रियल इस्टेट तज्ज्ञ राहुल श्रीवास्तव यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, जर तुम्हाला पुण्यात घर खरेदी करायचं असेल तर हा सौदा चांगला ठरू शकतो. आता विक्री कमी आहे, त्यामुळे किमती जास्त नाही. सोबतच नवे प्रकल्प लॉन्च होत असल्याने तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. अशात किमती वाढण्यापूर्वी एक चांगली गुंतवणूक येथे करता येऊ शकते.