IMD Forecast : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात, विशेषतः कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले. त्यामुळे दोन दिवसात कोकण किनारपट्टी आणि मुंबईला पावसाने झोडपलं. दोन-तीन दिवसांच्या दमदार बॅटिंगनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे.
कोकण किनारपट्टी भागात येणाऱ्या 24 तासांत पावसाची तीव्रता कमी होताना दिसेल आणि उद्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर दोन दिवस 'रेड अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला होता. आता 24 तासांनंतर इथेही पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Mumbai Rains Update: मुंबईची लाईफलाईन थाबंली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली)
कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या माहितीनुसार रायगड आणि पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, नंदुरबार, रत्नागिरी, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Mumbai Rain LIVE: मुंबईत जलप्रलय! घरांमध्ये पाणी शिरलं; बचावकार्य सुरु)
विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागांसाठी आज 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मात्र, उद्यापासून या भागात कोणताही इशारा देण्यात आलेला नाही, याचा अर्थ पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.