Pune News: पुणेकरांनो अलर्ट राहा, 'या' 4 ठिकाणी पावसाने घातला धुमाकूळ, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी पुण्याच्या कोंढवा,सिंहगड रोड,आंबेगाव आणि कात्रज परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Rain Video Viral

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Rain Update Today : मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी पुण्याच्या कोंढवा,सिंहगड रोड,आंबेगाव आणि कात्रज परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झाली.अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दिवसभर कडक उन्हामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे पुणेकर त्रस्त झाले होते.सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि त्यानंतर शहराच्या विविध भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह वाऱ्याचाही जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील काही दिवस ढगाळ वातावरण

भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शहरात पावसाची हजेरी लागली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर वाहतूक काही काळ मंदावली होती. 

Advertisement

नक्की वाचा >>Sindhudurg News: तारकरली समु्द्रात पुण्याच्या तरुणाचा करुण अंत, मित्रही सोबत होता, आईसोबत फोनवर बोलला अन्..

तरुणांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला

मात्र उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला.काही ठिकाणी नागरिक आणि तरुणाईने पावसात भिजण्याचा आनंद लुटला. दरम्यान,हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी,असे सांगण्यात आले आहे.