Raj and Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील आगामी निवडणुका आणि त्यापूर्वीच मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या कथित घोळावरून प्रमुख विरोधी पक्ष नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख विरोधपक्षांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणूक पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5-6 महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांचा थेट सवाल
राज ठाकरे यांनी म्हटलं की, निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथेच आहे. 2024 पूर्वी आणि नंतरच्या दोन याद्या मी पाहिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जी यादी जाहीर झाली, त्यात फक्त नावं आहेत, फोटो नाहीत. निवडणूक आयोग एकमेकांवर सर्व जबाबदारी ढकलत आहे.
(नक्की वाचा- MVA Press Conference: निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसरं चालवतंय, आम्हाला संशय आहे: जयंत पाटील)
...तोपर्यंत निवडणुका घेऊ नका- राज ठाकरे
राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, जोपर्यंत मतदार याद्या दाखवल्या जात नाहीत, तोपर्यंत गोंधळ होणारच आहे. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. गेल्या 5 वर्षांत निवडणुका झालेल्या नाहीत. मतदारयाद्या सुधारण्यासाठी आणखी 6 महिने लागले, तरी आम्हाला हरकत नाही. निवडणूक आयोगाला लवकरच यावर नोटिफिकेशन द्यायला सांगितले आहे. त्यानंतर दोन दिवसांत आम्ही आमचा निर्णय कळवू."
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देखील राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करत राज यांनी म्हटलं की, राज्यात महायुतीच्या 232 जागा निवडून आल्यावरही जल्लोष नव्हता. जे निवडून आले, त्यांनाही धक्का बसला. मग ही कसली निवडणूक?" निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे, कोणासोबत होणार हे महत्त्वाचे नाही.
(नक्की वाचा- Gadchiroli News: नक्षल्यांचा म्होरक्या भूपतीचं समर्पण PM मोदी- शाहांच्या रणनीतीचं यश: देवेंद्र फडणवीस)
इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मतदारयाद्यांमधील घोळावर थेट भाजपवर आरोप केला. त्यांनी म्हटलं की, लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भाजपलाही पत्र दिले, पण ते आले नाहीत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, निवडणूक घ्यायची असेल, तर ती पारदर्शक घ्या. निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे की, तुम्हाला निष्पक्षपणे, पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तरच घ्या अन्यथा तुम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.
विधानसभा निवडणुकीवेळीच मतदार याद्यांमधीळ घोळ लक्षात आला होता. 19 ऑक्टोबरला याबाबत विधानसभा निवडणुकीआधीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं.काही भाजपा कार्यकर्ते मतदारयादीशी खेळतायत. वाटेल त्यांना ते मतदार याद्यांमध्ये घुतसवत आहेत, वाटेल त्यांना वगळलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.