वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा पोरगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. त्यानंतर त्यांना बावधन पोलिस स्थानकात नेण्यात आले होते. शिवाय आजच त्यांना न्यायालयात ही हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायायल परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्या वेळी या दोघांनी घेवून पोलिस आले त्यावेळी त्यांच्यावर टोमॅटो फेकण्यात आले. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली पण न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वकील शिवम निंबाळकर यांनी कोर्टात काय घडलं याची माहिती दिली. सरकारी पक्षाने आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. ही पोलिस कोठडी सात दिवसांची मागण्यात आली. या प्रकरणात अधिकचा तपास करायचा आहे. शिवाय वैष्णवीच्या शरिरावर जबर जखमा होत्या. त्यासाठी कोणतं हत्यार वापरलं गेलं त्याचा शोध घ्यायचा असल्याचं ही कोर्टात सांगण्यात आलं.
त्याच बरोबर हा गुन्हा करताना हगवणेंना कुणी कुणी मदत केली. यात आणखी काही गुन्हागार आहेत का याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. शिवाय वैष्णवीच्या कुटुंबीयांनी लग्नात मोठ्या प्रमाणात हुंडा दिला होता. तो मुद्देमालही जप्त करायचा असल्याचं सरकारी वकीलां मार्फत सांगण्यात आलं. हुंड्यात दिलेली फॉर्च्यूनर कार जप्त करण्यात आली आहे. पण दागिने आणि अन्य काही साहित्य जप्त करायचं आहे असं ही सांगण्यात आले. त्यासाठी चौकशी करायची आहे असं ही सांगण्यात आलं.
ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: चमत्कार! 15 मिनिटे हृदय बंद, तरीही जीव वाचला, हे कसं शक्य झालं?
त्यावर कोर्टाने या बापलेकांना 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या दोघां विरोधात 118 हे नवं कलम लावण्यात आलं आहे. जाणून बुजून एखाद्याला इजा पोहोचवणे याचा यात समावेश आहे. आजच्या सुनावणीत निलेश चव्हाण किंवा बाळाच्या कस्टडीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ही पहिली पोलिस कोठडी होती. यात तपासाच्या दृष्टीने ती दिली गेली आहे. ही संपल्यानंतर चौकशीत आणखी काही गोष्टी समोर येतील. त्यामुळे हगवणे भोवती आता चांगलाच आवळला आहे.