Dombivli ' घोटाळ्यांची चौकशी करायला पाच वर्ष कमी पडतील', राज ठाकरेंसमोर राजू पाटील यांचा निशाणा

Dombivli News : मनसे नेते राजू पाटील (Raju Patil)  यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devenra Fadnavis) यांनी चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे याबाबत मनसे नेते राजू पाटील (Raju Patil)  यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला .

राजू पाटील म्हणाले की, ज्या प्रमाणात या लोकांमध्ये भ्रष्टाचार फोफावला होता. त्याला कुठेतरी फडणवीस आळा घालत आहेत. फडणवीस चांगलं काम करत आहेत. चांगल्या कामांचं स्वागत केलं पाहिजे. चांगल्या कामाचे स्वागत झालं पाहिजे. पैसे जनतेचे आहेत. घोटाळा करुन पैसे कमवणार, त्यातून राजकारण करणार, अडीच वर्षात टेंडर घोटाळे झालेत त्याची चौकशी करायला पाच वर्षे देखील कमी पडतील, असा टोला मनसेने राजू पाटील शिवसेना शिंदे गटाला लगावला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजू पाटील यांच्यात तर्फे टेनिस क्रिकेट स्पर्धा डोंबिवलीत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या स्पर्धेला राज ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी राजू पाटील बोलत आहेत. 

अमृत योजनेवरुन शिंदे गटासह ठाकरे गटाला लक्ष्य

केडीएमसी हद्दीतील अमृत योजनेवरून राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटासह शिवसेना  ठाकरे गटाला लक्ष्य केलं. शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी अमृत योजनेचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं. तर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी लोकांची दिशाभूल करू नका ,तांत्रीक टेंडर अजून बाकी आहेत हे पूर्ण होण्यासाठी काम सहा महिने लागतील असा टोला आमदार मोरे याना लगावला होता .याबाबत बोलताना पाटील यांनी दोघांना नाव न घेता लक्ष्य केलं. 

Advertisement

( नक्की वाचा : Dombivli : 65 इमारतींमधील नागरिकांची पुन्हा फसवणूक, बिल्डरांनी गोळा केले तब्बल दीड कोटी )
 

राजू पाटील म्हणाले की, अमृत योजना माझ्या वेळेला सुरू झाली आणि ज्यांनी हप्ते खाऊन तीन-तीन कोटीचे गाड्या घेतल्या ते आता डेडलाईन देतायत. हे सर्व एका थाळीचे चट्टेपट्टे आहेत. हे काम कुठं थांबलं आहे, हे सर्वांना माहिती आहे, असं पाटील यांनी सांगितलं.