'लोकसभा निवडणुकीत माझी फसवणूक झाली', राजू शेट्टींनी ठाकरे -पवारांना घेरले

राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील अशा चर्चा जोरदार रंगली होत. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडी कडून नवीन उमेदवाराचे नाव समोर आलं.

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील अशा चर्चा जोरदार रंगली होत. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडी कडून नवीन उमेदवाराचे नाव समोर आलं. यानंतर राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली. मात्र आता निवडणुकीनंतर या लोकसभेत महाविकास आघाडी कडून माझी फसवणूक करण्यात आली असा, आरोप राजू शेट्टींनी केला आहे. निवडणुकीपूर्वी सकारात्मक चर्चा झालेली असताना सुद्धा जे करायचं तेच महाविकास आघाडीने केलं असं शेट्टी म्हणालेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील आणि सतेज पाटील या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी माझ्यासोबत शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी देखील मी दूरध्वनीवरून बोललो. त्यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर माझी भूमिका काय असणार यासंदर्भात ड्राफ्ट देखील माझ्याकडुन  तयार केला. पण नंतर मात्र त्यांना जे करायचं तेच केलं असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजू शेट्टी यांची फसवणूक केल्याचा थेट आरोप शेट्टी यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज - Fathers Day: गौरवास्पद! IPS बापाकडून सलामी घेणाऱ्या IAS लेकीची गोष्ट

राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चाही होती. ही जागा तशी शिवसेना ठाकरे गटाकडे होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदार संघात सत्यजित सरूडकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या समोर अडचण निर्माण झाली. त्यांना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जावे लागले. मात्र या निवडणुकीत शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी बाजी मारली. शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजित सरूडकर यांना निसटता पराभव स्विकारावा लागला. तर राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना तब्बल साडे तीन लाखाने पराभवाचा सामना करावा लागल.   

Advertisement