राहुल कांबळे
नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात दुर्मिळ असा चष्माधारी नाग आढळून आला आहे. हा नाग एका व्यक्तीच्या बुटात जावून बसला होता. जेव्हा ही बाब तिथल्या लोकांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. शिवाय वाईल्डलाईफ रेस्क्यूअरला हा पाचारण करण्यात आलं. त्यानतंर अक्षय दांगे हे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात घरात कोरड्या जागेचा शोध घेत हे नाग असे आश्रय घेतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही घटना रविवारी सकाळी घडली. एका कर्मचाऱ्याला शूज घालण्यापूर्वी आत काहीतरी हलत असल्याचे लक्षात आले. त्याला त्यात साप असल्याचं दिसून आलं. त्याने तातडीने अक्षय दांगे यांना बोलावले. त्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण करून, शूजमध्ये नाग लपला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या बुटात लपलेला नाग सुरक्षित बाहेर काढले. हा चष्माधारी नाग होता. तो दुर्मिळ जातीचा नाग समजला जातो. तो जवळपास चार फूट लांब होता. त्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.
सर्प मित्र असलेल्या अक्षय दांगे यांनी सांगितले की, “पावसाळ्यात साप घरात येतात. कारण त्यांना कोरडी जागा हवी असते. त्यांना सुरक्षित ठिकाण हवं असतं. शूज, कपाटं, पलंगाखालची जागा यासारख्या ठिकाणी साप त्यामुळे अनेक वेळा लपतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन, पावसाळ्यात शूज घालण्या आधी ते नेहमी तपासावेत. असं त्यांनी आवाहन केलं आहे. नाही तर काही वेळा ते जीवावर बेतू शकतं असं ही ते म्हणाले.
चष्माधारी नाग हा विषारी असून महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे. वेळेवर लक्ष देऊन आणि योग्य रेस्क्यू केल्यामुळे संभाव्य धोका टळला. दरम्यान नाग दिसल्यास घाबरून जाऊ नका. तसेच स्वतः त्याला हाताळण्याचा प्रयत्न ही करू नका. त्यासाठी प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन अक्षय दांगे यांनी केले आहे. हा नाग पकडताना अनेकांनी गर्दी केली होती. नागाला पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक आवासात सोडण्यात आलं.